Next
गायन, वादन आणि नृत्यकलेने रंगणार ‘तालयात्रा’
BOI
Tuesday, April 02, 2019 | 05:39 PM
15 0 0
Share this article:


पुणे : तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या तालयोगी आश्रमाच्या आठव्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने गायन, वादन व नृत्य या तीनही कलांना जोडणाऱ्या ‘तालयात्रा’ कार्यक्रमाचे आयोजन यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे सोमवारी, आठ एप्रिल २०१९ रोजी करण्यात आले आहे. या महोत्सवात पं. सुरेश तळवलकर यांचे शिष्य गायन, वादन व नृत्याचे सादरीकरण करणार आहेत. 

यामध्ये सावनी तळवलकर, आशय कुलकर्णी हे तबलावादन तर सुजित लोहोर, भागवत चव्हाण, कृष्णा सांळुखे हे पखवाजवादन सादर करणार आहेत. विनय रामदासन यांचे गायन, अनिरुद्ध जोशी यांचे सितारवादन आणि संदीप कुलकर्णी यांचे बासरी वादनही रसिकांना ऐकायला मिळणार आहे. अमृता गोगटे, अस्मिता ठाकूर, शीतल लाळगे, ईशा फडके, मृणालिनी खटावकर, श्रुती आपटे, आयुषी दीक्षित, रजत पवार हे नृत्यकला सादर करणार आहेत. अभिषेक भुरूक, उमेश वारभुवन, ऋतुराज हिंगे आणि ईशान परांजपे हे वेस्टर्न पर्कशनचे वादन करतील. तन्मय देवचके, अभिषेक शिनकर (संवादिनी), अनय गाडगीळ (की-बोर्ड) आणि तेजस माजगावकर (टाळ) यांचेही सादरीकरण रसिकांना पाहायला मिळेल. महोत्सवाचे निवेदन गौरी स्वकुळ करणार आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search