Next
‘ट्रेन १८’चे नामकरण ‘वंदे भारत एक्स्प्रेस’
BOI
Monday, January 28, 2019 | 12:50 PM
15 0 0
Share this story


नवी दिल्ली : ‘संपूर्ण भारतीय बनावटीच्या पहिल्या इंजिनविरहित ‘ट्रेन १८’चे नाव ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ असे करण्यात आले आहे,’ अशी माहिती  रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रविवारी, २७ जानेवारी २०१९ रोजी नवी दिल्ली येथे दिली. 

‘देशातील ही पहिली इंजिनविरहित रेल्वे असून, ती दिल्ली-वाराणसी मार्गावर धावणार आहे. तिचा कमाल वेग ताशी १६० किलोमीटर इतका असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच या रेल्वेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. चेन्नईमधील इंटिग्रल कोच फॅक्टरीत १८ महिन्यांच्या परिश्रमांनंतर ही १६ डब्यांची रेल्वेगाडी तयार करण्यात आली असून, त्यासाठी ९७ कोटी रुपये इतका खर्च आला आहे,’ असेही गोयल यांनी सांगितले. 

रेल्वेमंत्री पीयूष गोयल
‘‘मेक इन इंडिया’ अंतर्गत जागतिक दर्जाची रेल्वे बनवली जाऊ शकते, याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. ही पूर्णपणे भारतीय बनावटीची रेल्वे असून, त्यासाठी अनेक नागरिकांनी विविध नावे सुचवली आहेत. मात्र, आम्ही त्याचे नाव ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ही प्रजासत्ताक दिनानिमित्त जनतेला मिळालेली भेट आहे. लवकरच तिचे उद्घाटन करावे अशी विनंती आम्ही पंतप्रधानांना केली आहे,’ असे गोयल नमूद केले. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link