Next
पुण्यात अत्याधुनिक व स्वयंचलित ई-टॉयलेट
खासदार शिरोळे यांच्या खासदार निधीमधून तरतूद
प्रेस रिलीज
Friday, September 21, 2018 | 03:14 PM
15 0 0
Share this article:

जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेल शिवसागरसमोर उभारलेल्या ई-टॉयलेटचे उद्घाटन करताना महापौर मुक्ता टिळक. शेजारी स्वाती लोखंडे, खासदार अनिल शिरोळेपुणे : नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी स्वच्छ व चांगली शौचालये उपलब्ध व्हावी या हेतूने खासदार अनिल शिरोळे यांच्या विकास निधीमधून शहरात अत्याधुनिक व स्वयंचलित ई-टॉयलेट उपलब्ध करून देण्यात आली आहेत. महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेल शिवसागरसमोर उभारलेल्या ई-टॉयलेटचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले.

या वेळी खासदार अनिल शिरोळे, डेक्कन जिमखाना– मॉडेल कॉलनी प्रभागाचे नगरसेवक व पीएमपीएमएलचे संचालक सिद्धार्थ शिरोळे, नीलिमा खाडे, स्वाती लोखंडे, जोत्स्ना एकबोटे, ईराम सायंटीफिकचे प्रमुख विपणन व्यवस्थापक बरनार्ड अॅनड्रेड, अशोका डेव्हलपर्सचे विशाल कदम, आदित्य चासकर आदी उपस्थित होते.

या प्रसंगी महापौर टिळक म्हणाल्या, ‘आज शहराची लोकसंख्या लक्षात घेत शौचालयांची संख्या वाढणे गरजेचे आहे, हेच जाणत महापालिकेनेही हा प्रश्न सोडविण्यासाठी पावले उचलली आहेत. नागरिकांच्या मागणीचा विचार करीत कमी जागेत अत्याधुनिक आणि मानवविरहित अशी ही ई-टॉयलेट उभारत खासदार अनिल शिरोळे यांनी केलेल्या या मदतीबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. ज्याप्रमाणे परदेशात सार्वजनिक शौचालयांची स्थिती चांगली असते त्याच धर्तीवर आम्हीदेखील ही ई-टॉयलेट स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्नशील असू यामध्ये नागरिकांचे सहकार्य देखील अपेक्षित आहे.’        

खासदार शिरोळे म्हणाले, ‘आज शहरात स्वच्छता हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यावर काम करीत असताना सार्वजनिक शौचालयांचा प्रश्न कळीचा मुद्दा आहे हे जाणवले. प्रत्येक नागरिकाला घरातून बाहेर पडल्यानंतर सार्वजनिक शौचालयाचा वापर करावा लागल्यास त्या ठिकाणी असलेली अस्वच्छता त्यांच्या आरोग्यासाठी देखील घातक आहे. हेच लक्षात घेत एक स्मार्ट शहराच्या दिशेने वाटचाल करीत असताना ई-टॉयलेटसारखी मानवविरहित व स्वयंचलित प्रणाली असलेली ही शौचालये बसविण्याचे माझ्या मनात होते. त्यालाच आता मूर्त स्वरूप आले आहे. जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेल शिवसागरसमोर व मॉडेल कॉलनी येथील ओम सुपर मार्केट जवळ या भागात आज या प्रातिनिधिक ई–टॉयलेटचे उद्घाटन करण्यात आले. अशा पद्धतीने तब्बल १० ठिकाणी आम्ही अशी १४ ई–टॉयलेट उभारणार आहोत. ही टॉयलेट सेल्फ मेंटेन असल्यामुळे त्याचा नागरीकांनाही निश्चित फायदा होईल.’        

ई-टॉयलेटबद्दल बोलताना सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, ‘ही ई-टॉयलेट गंज न चढू शकणाऱ्या नॉन रस्टिंग स्टीलचा वापर करीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बनविण्यात आली आहेत. महिला व पुरुष अशा दोघांसाठी वेगवेगळी अशी ही ई-टॉयलेट असून, त्यामध्ये स्वच्छतेची विशेष काळजी घेण्यात आली आहे. ही ई-टॉयलेट इलेक्ट्रॉनिक पद्धतीची असून, त्याच्या अंतर्भागात पाणी सोडणे, फ्लोअर साफ होणे आदी कामे स्वयंचलित पद्धतीने होतील. पाण्याची सोय म्हणून प्रत्येक टॉयलेटच्या वर प्रत्येकी ३०० लिटरची पाण्याची टाकी बसविण्यात आली आहे. याबरोबरच ही टॉयलेट ड्रेनेज लाइनला जोडलेली असल्याने घाणीचा त्रास होणार नाही याची विशेष दक्षत घेण्यात आली असल्याचे आहे.’

‘याबरोबरच हे ई-टॉयलेट वापरायचे असल्यास आपल्याला पन्नास पैसे, एक रुपया, दोन रुपये, पाच रुपये अथवा १० रुपये यापैकी कोणतेही एक नाणे वापरता येणार आहे. नागरिकांना सवय लागावी म्हणून ही नाममात्र रक्कम ठेवण्यात आली असल्याने तुम्ही कोणतेही नाणे टाकले की हे टॉयलेट अनलॉक होऊन तुम्हाला ते वापरता येईल. या ई-टॉयलेटचे वैशिष्ट्य म्हणजे याला सेन्सर बसविण्यात आले असून, ही सर्व टॉयलेट इंटरनेटच्या माध्यमातून जोडलेली आहेत. यामध्ये असलेल्या सेन्सरमुळे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाला या टॉयलेटची स्थिती, बिघाड हे लागलीच कळणार आहे. ईराम सायंटिफिक व अशोका डेव्हलपर्स यांच्या मदतीने ई-टॉयलेटचे अॅपही बनविण्यात आले असून, त्याद्वारे याचे अत्याधुनिक पद्धतीने व्यवस्थापन करण्यात येणार आहे.’

पहिल्या टप्प्यात अशा प्रकारची ई-टॉयलेट संपूर्ण शहरात १० ठिकाणी बसविण्यात येणार असल्याचे सांगत खासदार अनिल शिरोळे यांनी तब्बल सव्वा दोन कोटींचा निधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेल शिवसागरसमोर दोन महिलांची, तर मॉडेल कॉलनी, ओम सुपर मार्केटजवळ एक महिला व एक पुरुषांसाठीचे उभारलेल्या ई-टॉयलेटचे उद्घाटन करण्यात आले. याशिवाय शहरातील फर्ग्युसन रस्त्यावरील रूपालीसमोर, हिरवाई गार्डन, शिवाजीनगर न्यायालय परिसर, सेनापती बापट रस्ता, वारजे फ्लायओव्हरच्या खाली, नीलायम चित्रपट गृहाजवळ, विमान नगर आणि सिंहगड रस्त्यावरील राजाराम पुलाजवळ असलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प या ठिकाणी ही ई-टॉयलेट उभारण्यात येतील.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search