Next
‘तंत्रज्ञान शिक्षकाची जागा घेऊ शकत नाही’
केंद्रीय शालेय शिक्षण विभागाचे माजी सचिव अनिल स्वरूप यांचे प्रतिपादन
प्रेस रिलीज
Saturday, April 27, 2019 | 05:31 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षणात बदल घडवता येईल; परंतु असे करताना तंत्रज्ञानाच्या मर्यादाही लक्षात घ्यायला हव्यात. तंत्रज्ञान हे साधन आहे, ते शिक्षकाची जागा घेऊ शकत नाही. आपल्या देशात शाळांमध्ये शिक्षकांची उपस्थिती कशी राखता येईल यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. शाळेत डिजिटल ब्लॅकबोर्ड असेल, पण शिक्षकच उपस्थित नसेल, तर त्याचा काय उपयोग,’ असे परखड मत केंद्रीय शालेय शिक्षण विभागाचे माजी सचिव अनिल स्वरूप यांनी व्यक्त केले.

विद्यार्थ्यांपर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण व करिअर संदर्भातील मार्गदर्शन पोहोचवण्यासाठी काम करणाऱ्या पुण्यातील श्यामची आई फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात ते स्वरूप यांचे ‘नॉट जस्ट अ सिव्हिल सर्व्हंट’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाच्या अनुषंगाने प्रगती फाउंडेशनचे अध्यक्ष अरुण वाकलू यांनी स्वरूप यांची मुलाखत घेतली. 

या वेळी श्यामची आई फाउंडेशनचे अध्यक्ष भारत देसडला, संचालिका शीतल बापट, संचालक संदीप महाजन, राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी, सुनील मगर, एस. के. जैन उपस्थित होते. स्वरूप यांनी आपल्या ३४ वर्षांच्या कारकिर्दीत कामगार मंत्रालय, केंद्रीय कोळसा मंत्रालय, शालेय शिक्षण विभाग अशा विविध विभागांमध्ये काम केले आहे.

‘इंग्लंड, फिनलँड अशा परदेशांत शिक्षणासाठी कोणत्या योजना राबविल्या जात आहेत, यावरून आपल्याकडे राबवायच्या योजना ठरविल्या जातात; मात्र त्यांची यशस्विता पडताळून पाहिली जात नाही. भारतात प्रत्येक राज्यातील परिस्थिती वेगळी असून, एकच धोरण सर्व ठिकाणी लागू पडत नाही,’ असा मुद्दा स्वरूप यांनी मांडला.

ते म्हणाले, ‘शिक्षणात डिजिटल साधनांद्वारे सुधारणा आणण्याच्या बाबतीत आपण हार्डवेअरला सर्वाधिक महत्त्व देतो; पण हार्डवेअर उपकरणांच्या मागे न लागता आधी डिजिटल साधने वापरण्याची प्रक्रिया निश्चित करून सॉफ्टवेअरवर लक्ष केंद्रित करायला हवे आणि नंतर जरुरीप्रमाणे हार्डवेअर घ्यायला हवे. शालेय शिक्षणात शिक्षकाला पर्याय असूच शकत नाही. तंत्रज्ञान हे एक साधन असून, त्याच्या मदतीने शिक्षकांना आणखी सक्षम करण्याची गरज आहे.’ 

श्यामची आई फाउंडेशनच्या शीतल बापट यांनी प्रास्ताविक केले आणि आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 60 Days ago
Has anybody made such claim ?
0
0

Select Language
Share Link
 
Search