Next
संस्कार मूल्यांचा संदेश देणारा लघुपट ‘मेरी सायकल’
BOI
Monday, October 15 | 12:55 PM
15 0 0
Share this story

‘मेरी सायकल’ या लघुपटाच्या प्रीमियर शो प्रसंगी (डावीकडून)  प्रियंका आनंद, अगस्त आनंद, दिलीप राज,आर्विका गुप्ता, पार्थ पटकराव, डॉ. आदित्य पटकराव व स्वराज कांबळे.

पुणे : घेण्यापेक्षा देण्यामध्ये अधिक आनंद सामावलेला असतो, हा संदेश देणाऱ्या ‘मेरी सायकल’ या लघुपटाचा प्रीमियर शो नुकताच येथील वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंटच्या प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आला होता. त्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. 

निनाद हा एका मध्यमवर्गीय कुटुंबातील छोटा मुलगा. त्याच्या वाढदिवशी त्याची मोठी बहीण त्याला एक नवीकोरी सायकल भेट देते. त्याच दिवशी निनाद आपल्या मित्रांबरोबर क्रिकेट खेळण्यासाठी सायकल घेऊन मैदानावर जातो. खेळून झाल्यावर पाहतो तर त्याची सायकल चोरीला गेल्याचे त्याच्या लक्षात येते. सायकल हरवल्याचे समजताच वडील निनादला रागावतात. अखेर पोलिसात तक्रार दिली जाते. त्यानंतर काय होते हे पडद्यावर पाहणे उत्सुकतेचे ठरेल. निनादची सायकल त्याला सापडते का ? सायकल कोणी चोरलेली असते ? का चोरलेली असते ? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात. 

स्वराज कांबळे व पार्थ पटकराव
या लघुपटात निनादची भूमिका स्वराज कांबळे या छोट्या मुलाने केली आहे. पडद्यावर प्रथमच काम करताना स्वराजमध्ये नवखेपणा जाणवत नाही. अतिशय समरसून त्याने निनादची भूमिका केली आहे. त्याला पार्थ पटकराव या छोट्या मुलाने चांगली साथ दिली आहे. अन्य कलाकारांमध्ये अगस्त आनंद (वडील), रिचा सिंग (आई), आर्विका गुप्ता (बहीण), डॉ. आदित्य पटकराव (पोलीस इन्स्पेक्टर) पार्थ पटकराव (पार्थ) आणि हिंदी सिनेमासृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेते दिलीप राज यांनी (पार्थचे आजोबा) भूमिका केल्या आहेत.

अगस्त आनंद यांनी या लघुपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. लघुपटाची निर्मिती आदित्य पटकराव आणि प्रियंका आनंद यांनी केली आहे. 

एकूणच लुप्त होत चाललेल्या मानवी मूल्यांना  पुनरुज्जीवित करण्याचे काम हा लघुपट करतो. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link