Next
पहिल्या सायकल रॅलीला रत्नागिरीकरांचा उत्तम प्रतिसाद
BOI
Tuesday, October 09, 2018 | 11:05 AM
15 0 0
Share this article:रत्नागिरी :
आरोग्यवर्धक आणि इंधनाची बचत करणारा पर्याय म्हणून रत्नागिरी शहरात सात ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या सायकल रॅलीला उत्तम प्रतिसाद मिळाला. सुमारे तीनशे विद्यार्थी आणि १०० नागरिकांनी आयटीआय/शिवाजीनगर ते हातखंबा आणि पुन्हा शिवाजीनगर अशा २० किलोमीटर अंतराच्या रॅलीत सहभाग घेतला. रत्नागिरी सायकल क्लबच्या पुढाकाराने आणि वीरश्री ट्रस्ट व ट्रिनिटी हेल्थ क्लबच्या संयुक्त विद्यामाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी सकाळी सहा वाजता ‘आयटीआय’जवळच्या आठवडा बाजाराजवळ पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी श्रीफळ वाढवून आणि जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी झेंडा दाखवून रॅलीचे उद्घाटन केले. त्यानंतर १०० नागरिकांनी हातखंब्याकडे कूच केले. या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलिस निरीक्षक अनिल विभुते, जिल्हा क्रीडाधिकारी मिलिंद दीक्षित आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर ३०० विद्यार्थ्यांच्या रॅलीचे उद्घाटन नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी केले. या वेळी रोटरी क्लबचे ज्येष्ठ सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते धरमसी चौहान यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला.शहरातील रस्त्यांवर मोठी रहदारी असल्याने सायकलस्वारांना अडथळ्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे शहरात स्वतंत्र ‘सायकल ट्रॅक’ करावा, अशी विनंती वीरश्री ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. नीलेश शिंदे यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे केली. जिल्हाधिकाऱ्यांनी नव्या रस्त्यांवर अशी सुविधा देण्याचा मानस असल्याचे सांगितले. नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी स्वतः वीस किलोमीटरची रॅली पूर्ण केली. ‘हा उपक्रम खूपच कौतुकास्पद आहे. स्वच्छ, सुंदर, रत्नागिरीची प्रदूषणमुक्ततेकडे वाटचाल करण्यासाठी इंधन बचत करणारी व फिटनेस राखणारी सायकल सर्वांनी चालवावी व ‘सायकल डे’ साजरा व्हावा,’ अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.सुदृढ आरोग्य, सुंदर शहर आणि वाढते इंधन दर यावर एकत्रित उपाय म्हणून सायकलस्वारांना प्रोत्साहन देण्याकरिता सायकल क्लब स्थापन करण्यात आला. या रॅलीनंतर सभासद संख्या वाढू लागली आहे. दररोज सायकलिंग आणि दर रविवारी सायकल भ्रमण मोहीम सुरू करण्याचा या क्लबचा मानस आहे.रॅलीसोबत रिकामा टेम्पो, वैद्यकीय व्यवस्था, रुग्णवाहिका आदींची व्यवस्था ठेवण्यात आली होती. मार्गावर १० ठिकाणी एनर्जी ड्रिंक, पाणी देण्याची व्यवस्था केली होती. त्यासाठी सामाजिक संस्थांनी सहकार्य केले. रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे चिरायू हॉस्पिटलशेजारील स्टॉलवर पाणी, बिस्किटे व एनर्जी ड्रिंकची सुविधा रॅलीत सहभागी झालेल्यांना देण्यात आली. त्या ठिकाणी पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय महाडिक यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते.वीरश्री ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. नीलेश शिंदे, डॉ. तोरल शिंदे, डॉ. निशिगंधा पोंक्षे, डॉ. नितीन दाढे, धन्वंतरी हॉस्पिटचे सर्व कर्मचारी आणि सामाजिक संस्थांनी या रॅलीचे उत्तम नियोजन केले होते. इंडियन मेडिकल असोसिएशन, जाणीव फाउंडेशन, रोटरी क्लब, लायनेस क्लब, लायन्स क्लब, संस्कार भारती, मानवता संयुक्त संघ, रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार संघ, सकाळ मीडिया, लेन्स आर्ट, बाबुराव जोशी गुरुकुल व अॅड. नानल गुरुकुल या संस्थांचा यात सक्रिय सहभाग होता. क्रेडाई, गद्रे मरीन्स, हिंद सायकल, कार्निव्हल, ट्रँक्विलिटी यांचे रॅलीला सहकार्य लाभले. सांगता कार्यक्रमात सहभागी मोठ्या व्यक्तींना मेडल्स देण्यात आली, तर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली.

(छायाचित्रे : सिद्धेश वैद्य, उपेंद्र बापट, माउली फोटो, रत्नागिरी)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Sandip About 226 Days ago
Khup chan upkram
0
0

Select Language
Share Link
 
Search