Next
शेतकऱ्यांना मिळाली ढोबळी मिरची लागवडीची संपूर्ण माहिती
BOI
Monday, May 06, 2019 | 11:49 AM
15 0 0
Share this article:सोलापूर :
सिमला मिरची (ढोबळी मिरची) लागवड या विषयावरील चर्चासत्र सोलापूरमध्ये पाच मे रोजी पार पडले. सिमला मिरचीची तांत्रिक पद्धतीने लागवड आणि मिरचीच्या निर्यातीबद्दल या वेळी माहिती देण्यात आली. या चर्चासत्राला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला.

कृषिविकास फाउंडेशनने आयोजित केलेले हे चर्चासत्र महाराष्ट्रातील या विषयावरील सर्वांत मोठे चर्चासत्र असल्याचा दावा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. प्रशांत नाईकवडी (अध्यक्ष, रोमिफ इंडिया, राज्य सल्लागार), योगेश जाधव (ब्रँच मॅनेजर, नोन-यू सीड), डॉ. सारिका शिंदे-पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

सिमला मिरची हे पीक शेतकऱ्यांचा आर्थिक आधारस्तंभ बनतेय. परंतु पारंपरिक पद्धतीच्या वापरामुळे आणि नियोजनाअभावी शेतकऱ्यांचे खूप नुकसान होत आहे. त्यामुळे नवीन तंत्रज्ञानानुसार लागवड आणि वातावरणातील बदलानुसार आर्थिक ताळेबंद घालून सिमला मिरचीची लागवड कशी करायची, याची सर्व टप्प्यांतील तांत्रिक माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. यामध्ये डॉ. विनायक शिंदे-पाटील, अजय आदाटे (सिमला मिरची तज्ज्ञ), भारत रानरुई व डॉ. संतोष चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. हिरव्या मिरचीच्या निर्यातीसाठीचे निकष आणि प्रक्रियेबद्दलही माहिती देण्यात आली. 

या कार्यक्रमात सिमला मिरचीबद्दलच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंतचे सर्व टप्पे पडद्यावर दाखवण्यात आले. उपस्थित शेतकरी बांधवांच्या सर्व शंकांना चर्चासत्रात उत्तरे देण्यात आली.

कृषिविकास फाउंडेशनने या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाकरिता प्रसाद मोहिते यांच्या शाळेसाठी मदत केली. या कार्यक्रमाचे आयोजन कृषिविकास फाउंडेशन, कृषिसमर्पण फाउंडेशन, रोमिफ इंडिया, नोन यू सीड्स इंडिया प्रा. लि., अॅग्रिकॉस अॅग्रो इंडस्ट्रीज, पुणे यांच्या वतीने करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्कर्ष माने यांनी केले, तर आभार बालाजी थोरात यांनी मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 103 Days ago
Farmers in Marathawada and Vidarbh should receive this information , as well .
0
0
अजय About 106 Days ago
Great program for farmers of capsicum
0
0
BDGramopadhye About 106 Days ago
Excellent idea . Would other states follow suit ? How about Karnataka ? And Andhra and Telengan ?
0
0

Select Language
Share Link
 
Search