Next
‘शेतकऱ्यांनी उत्पादनाचे मार्केटिंग करावे’
BOI
Thursday, November 23 | 06:18 PM
15 0 0
Share this story

कुऱ्हे पानाचे (ता. भुसावळ) : ‘शेतकऱ्यांनी उत्पादनाबरोबरच मालाचे स्वतः मार्केटिंग करावे. गटशेतीद्वारे ते शक्य आहे. विविध ठिकाणच्या बाजारपेठांची माहिती घेऊन रिटेलमध्ये माल विक्री केल्यास आपल्या पानांना चांगल्याप्रकारे कसा भाव मिळू शकतो यासाठी गात तयार करून काही होतकरू तरुण शेतकऱ्यांनी सुरुवात करावी,’ असे ‘आत्मा’चे संचालक शिवाजी आमले यांनी सांगितले.

येथे पानमळेधारक शेतकऱ्यांचा मेळावा नुकताच झाला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला सरपंच सुरेश शिंदे, सुधाकर बडगुजर, माजी सरपंच रवींद्र वराडे, व्ही. एस. पवार, कृषी सहायक ए. डी. पाटील, रवींद्र नागपुरे, प्रमोद उंबरकर, प्रवीण नागपुरे, डॉ. संजय बारी, संतोष वराडे, नामदेव वराडे, नामदेव बारी, प्रकाश बारी, भूषण बोबडे, नीतेश रंदाळे, रमेश नागपुरे, गोकुळ वराडे, गजानन बारी, सुनील बारी, अनिल फुसे, दिलीप कोथलकर, राजेंद्र वराडे, मोहन रंदाळे आदी उपस्थित होते.

या वेळी प्रकल्प उपसंचालक अनिल भोकरे यांनी ‘उत्पादन प्रमाणित करून नागवेलीच्या पानाचे अनेक प्रकारचे प्रॉडक्ट बनवून त्याची व्यवस्थित जाहिरात करावी, पानवेलींची पाने खाण्याचे फायदे समजावून दिल्यास चांगला भाव मिळेल,’ असे सांगितले.  

संदीप दिघुडे यांनी पानमळ्यावर येणाऱ्या मर रोग, हुमणी अडी व इतर रोगावरती नियंत्रण व उपाययोजना या विषयी मार्गदर्शन केले; तसेच शासकीय योजनांविषयी मार्गदर्शन केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Sharad Pant About 356 Days ago
Dear all, there is no scarcity of advisors. But I think before giving advice the wise people should have to think twice. Farming is full time job, how can farmers look after two things at one time I.e. production & marketing. Why the concept of farmers producers organization getting very low success, because farmers can't able to handle legal compliances of FPO s, he can't do marketing because of his intensive engagement in production. Even the Govt. Machinery such as ATMA, agriculture department are useless to help farmers anyways. In place of just advising if the people of these department will work honestly for the farmers, that will be the great helps to farmers. With best regards. Sharad Pant
0
0

Select Language
Share Link