Next
सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त रविवारी वॉकेथॉन
संचेती इन्स्टिट्यूटचा उपक्रम
BOI
Saturday, October 05, 2019 | 03:37 PM
15 0 0
Share this article:

वॉकेथॉनबद्दल माहिती देताना संचेती इन्स्टिट्यूटचे पेडियाट्रिक आर्थोपेडिक तज्ज्ञ डॉ. संदीप पटवर्धन

पुणे : ‘जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त रविवारी, सहा ऑक्टोबर २०१९ रोजी संचेती इन्स्टिट्यूट ऑफ आर्थोपेडिक्स अ‍ँड रिहॅबिलिटेशनच्या वतीने वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सकाळी साडेआठ ते ११ या वेळेत हे वॉकेथॉन होणार असून, साडेआठ वाजता संचेती हॉस्पिटल येथून याची सुरुवात होईल. यामध्ये एक, दोन आणि तीन किलोमीटर अशा तीन विभागातील वॉकेथॉनचा समावेश आहे. वॉकेथॉनमधील विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत,’ अशी महिती संचेती इन्स्टिट्यूटचे पेडियाट्रिक आर्थोपेडिक तज्ज्ञ डॉ. संदीप पटवर्धन यांनी दिली. 

डॉ. संदीप पटवर्धन म्हणाले, ‘सेरेब्रल पाल्सीच्या उपचारांमध्ये फिजिओथेरपी, आर्थोपेडिक उपचार व पालकांचे समुपदेशन महत्त्वाचे ठरते. सेरेब्रल पाल्सी हा मेंदूशी निगडित विकार असून, त्यामुळे लहान मुलांमध्ये हालचाल आणि स्नायूंची स्थिती यावर परिणाम होतो. हा विकार बरेचदा बालकाच्या जन्माआधी, जन्मावेळी किंवा जन्म झाल्यावर लगेचच मेंदूला झालेल्या इजेमुळे होऊ शकतो. हा विकार वयाबरोबर वाढत नसला तरी, मूल जसजसे मोठे अणि उंच होते, तसतसे त्याचे स्नायू कडक होतात आणि त्याला त्याचा योग्य वापर करता येत नाही. यामुळे चालणे, बसणे आणि उभे राहण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. या कडक किंवा ताठ झालेल्या स्नायूंना लहान वयातच फिजिओथेरपी, स्ट्रेचिंग, योग्य प्रशिक्षित पुर्नवसन यांच्या मदतीने आराम देणे गरजेचे आहे. प्लास्टर, बोटूलिनम उपचार, छोट्या शस्त्रक्रिया व नंतरच्या टप्प्यात मोठी शस्त्रक्रिया अशा उपचारपद्धतीचा समावेश असतो. आर्थोपेडिक उपचारांमुळे बालकाला अधिक स्वातंत्र्य मिळण्यामध्ये मदत होते, तसेच हालचाली करण्याच्या क्षमतेत सुधारणा होऊ शकते. त्यामुळेच सेरेब्रल पाल्सीच्या उपचारांमध्ये आर्थोपेडिक शस्त्रक्रियांची भूमिका महत्त्वाची असते.’

ते पुढे म्हणाले, ‘बॅकलोफेन पंप व मल्टीलेव्हल सिंगल इव्हेंट सर्जरीज यामुळे सेरेब्रल पाल्सीच्या उपचारात आमूलाग्र बदल झाले आहेत आणि या उपचारपध्दतींमुळे अधिकधिक सेरेब्रल पाल्सीग्रस्त मुले सामान्य मुलांप्रमाणे चालू शकतात. या सर्व उपचारांदरम्यान पालकांचे समुपदेशन होणे गरजेचे असून, त्यांना सर्व प्रकारे सहकार्य मिळणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत.’

संचेती इन्स्टिट्यूट ऑफ आर्थोपेडिक्स अ‍ँड रिहॅबिलिटेशनचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष डॉ. पराग संचेती म्हणाले, ‘संचेती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या बालकांपैकी आठ ते अठरा वर्षे वयोगटातील (वर्षाला साधारण चार हजार बालके) ६० टक्के बालके सेरेब्रल पाल्सीने ग्रस्त असतात. त्यांना किफायतशीर दरात उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी संचेती हॉस्पिटल नेहमीच प्रयत्नशील असते. त्याकरता संचेती हॉस्पिटल विविध सामाजिक संस्थांबरोबर काम करत असून, सातारा, वाई, पाचगणी आणि रत्नागिरीमध्ये मोफत शिबिरांचे आयोजन करते. सेरेब्रल पाल्सीमुळे हालचालींवर परिणाम होतो म्हणूनच अशा मुलांमध्ये सर्वप्रकारच्या दैनंदिन जीवनातील क्रिया, हालचालींना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. ज्यामुळे इतर सामान्य मुलांप्रमाणेच ही मुले खेळू शकतील आणि आनंदी राहू शकतील.’ 

फिजिओथेरपीस्ट डॉ. सलोनी राजे, डॉ. श्वेता कोटवाणी आणि डॉ. ऐश्वर्या पाटील आदी या वेळी उपस्थित होते. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search