Next
देश-विदेशांतील गणेशमूर्तींच्या दर्शनाची संधी
BOI
Saturday, September 15, 2018 | 04:06 PM
15 0 0
Share this article:

देवदत्त अनगळ यांच्या संग्रहातील देश-विदेशांतील गणेशमूर्तींच्या प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते झाले. या वेळी मूर्ती पाहताना अनिल शिरोळे, देवदत्त अनगळ आदी

पुणे : सर्वांचा लाडका गणपतीबाप्पा केवळ आपल्या देशातच नव्हे, तर अन्य वेगवेगळ्या देशांतही वेगवेगळ्या रूपांत पाहायला मिळतो. देशविदेशातील त्याची नाना रूपे बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात भरलेल्या प्रदर्शनात पुणेकरांना सध्या पाहायला मिळत आहेत. भारतीय संस्कृतीचे अभ्यासक देवदत्त अनगळ यांच्या संग्रहात असलेल्या देश-विदेशांतील तब्बल ४०० गणेशमूर्ती या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. या प्रदर्शनाचे खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. रविवार, १६ सप्टेंबर २०१८ पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी सात या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. 

या प्रदर्शनात आठव्या शतकापासून ते आजपर्यंतच्या मूर्तींचा समावेश आहे. तसेच भारतीय उपखंडातील कंबोडिया, नेपाळ, इंडोनेशिया, अफगाणिस्तान, थायलंड, ब्रह्मदेश या देशांतील वैशिष्ट्यपूर्ण गणेशमूर्ती प्रदर्शनात असून, सोने, चांदी, तांबे, पितळ, जस्त, हस्तिदंत, दगड व मातीपासून बनलेल्या दोन सेंटिमीटरपासून दोन फूट उंचीपर्यंतच्या मूर्तींचा त्यात समावेश आहे. 

त्रिशुंड गणेश, पंचमुखी गणेश, दोन हातांपासून अगदी बारा हात असणारे गणेश, वामन अवतारातील गणेश, बालगणेश, वाद्ये वाजविणारे, विविध पेहरावातील गणेश, अंगकोर या पुरातन काळातील प्रचलित असणाऱ्या नाण्यावरील, तसेच इंडोनेशियामधील चलनी नोटेवरील गणेश अशी श्री गणरायाची विविध रूपे प्रदर्शनात पाहता येणार आहेत.

देशविदेशातील गणेशमूर्तींचे प्रदर्शन :
स्थळ : बालगंधर्व रंगमंदिर कलादालन, पुणे
वेळ : सकाळी १० ते सायंकाळी सात या वेळेत १६ सप्टेंबर २०१८ पर्यंत. 

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील गणेशोत्सवाच्या विशेष बातम्या व लेख https://goo.gl/X8v1iW या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Balkrishna Gramopadhye About 213 Days ago
A documentary will reach more people..
0
0

Select Language
Share Link
 
Search