Next
पुण्यात ‘सु-चक्र’तर्फे सेंद्रीय फूड स्टोअर्सची सुरुवात
BOI
Saturday, July 20, 2019 | 05:21 PM
15 0 0
Share this article:

डावीकडून ज्येष्ठ पत्रकार मोरेश्वर जोशी, शिक्षणतज्ज्ञ राजेश खेले, सु-चक्र स्मार्ट होम स्टोअर्सचे संचालक संजय पांडेय आणि ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉ. दिलीप गाडगीळ

पुणे : सेंद्रीय उत्पादनांमधून आरोग्यदायी अन्न मोठ्या प्रमाणात सर्वत्र उपलब्ध व्हावे म्हणून सु-चक्र स्मार्ट होम स्टोअर्सतर्फे पुण्यात सेंद्रीय व आरोग्यदायी एक हजार फूड स्टोअर्स लवकरच सुरू होत आहेत. लुप्त झालेले पारंपरिक ज्ञान पुन्हा एकदा सामाजिक जनजीवनाचा भाग बनावे म्हणून एक चळवळ या स्वरूपात सु-चक्र या संस्थेने सुरू केली आहे. यातून महिला व ज्येष्ठ नागरिकांनाही सहभाग घेता येईल व घरातून ही फूड स्टोअर्स चालवता येतील. हा व्यवसाय गरजूंना घराघरातून चालवता येण्याचा हा अभिनव उपक्रम सु-चक्र या संस्थेने सुरू केला आहे, अशी माहिती सु-चक्र स्मार्ट होम स्टोअर्सचे संचालक संजय पांडेय यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी ‘सु-चक्र’चे भागीदार संचालक गुरुदत्त घवाळकर आणि पुण्यातले ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉ. दिलीप गाडगीळ उपस्थित होते. 

अधिक माहिती देताना संजय पांडेय म्हणाले, ‘सेंद्रीय शेतीच्या जोडीला त्याची पुणे शहरात एक मोठी बाजारपेठ आम्ही तयार करत आहोत. तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांना प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या घरातून हा व्यवसाय करणे शक्य होईल. यासाठी ‘सु-चक्र’तर्फे कर्जाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. या घरगुती स्टोअर्सची सुरूवात आम्ही पुण्यातील एक हजार घरांपासून करणार आहोत.’

‘सेंद्रीय शेतीपासून निर्माण होणारे हे पदार्थ पुणे जिल्ह्यातील सुमारे ४५० शेतकरी निर्माण करत आहेत. विषमुक्त सेंद्रीय अन्नधान्य पिकवणारे पुणे जिल्ह्यात दौंड, केडगाव, खेड, मंचर, आळेफाटा आणि मावळ भागात अनेक शेतकरी आहेत. त्यांचे धान्य व व शेतीयुक्त पदार्थ थेट पुण्यात विक्रीसाठी उपलब्ध होती. त्यांना पुण्यात एक हक्काची बाजारपेठ मिळू शकेल. यातून आपले पारंपरिक ज्ञान व निरामय आयुष्यासंबंधीच्या अनेक उपयुक्त गोष्टी ग्राहकांपर्यंत पोचतील. सेंद्रीय बाजारपेठेच्या जोडीला त्याचा वापर व्हावा यासाठी ही एक चळवळ म्हणूनच आम्ही उभी करत आहोत,’ असे पांडेय यांनी सांगितले.

‘या निमित्ताने आम्ही पुण्यात ‘सु-चक्र’तर्फे सेंद्रीय व सामान्य किराणा मालाची सर्वांत मोठी रेंज आणत आहोत. त्यामध्ये भाज्या, फळे, धान्य, डाळ, कडधान्ये, जात्यावर दळलेले गहू, नाचणी, ज्वारी व बाजरीचे पीठ, लाकडी घाण्याचे शेंगदाणे, करडई व तीळाचे तेल, गंधकयुक्त गूळ व साखर, हळद, धने आणि सर्व प्रकारचे मसाले तसेच पापड व लोणची यांचाही समावेश असेल. यातून शेतकरी थेट ग्राहकांशी जोडला जाईल,’ असे पांडेय यांनी नमूद केले.

‘या उत्पादनात गाय पाळणार्‍या शेतकर्‍यांनी बनवलेले गायीचे तूप, दूध व इतर पदार्थ आणि हेल्दी फूडमधील अनेक पदार्थही थेट ग्राहकांपर्यंत पोचतील. त्यामध्ये नाचणी व खपली डाएट बिस्किटे, नाचणीचे लाडू व केक, मल्टिग्रन कुकीज, बकव्हीट ब्रेड, किनोवा, ज्वारी फ्लैक्स, बाजरी फ्लैक्स, व्हीट पफ तसेच सुपर फूड कॅटेगरीमधील पौष्टिक पदार्थही उपलब्ध होतील,’ असे पांडेय यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search