Next
‘महाराष्ट्र केसरी’स्पर्धेसाठी अभिजित कटके, साईनाथ रानवडे यांची निवड
वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी पुणे शहर संघ जाहीर
BOI
Tuesday, December 11, 2018 | 06:24 PM
15 0 0
Share this article:

पुणे : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने ६२ व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती व मानाच्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेसाठी पुणे शहर संघ जाहीर करण्यात आला आहे. जालना येथे १९ ते २३ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत महाराष्ट्र केसरी किताबासाठी गादी विभागातून गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी अभिजित कटके, तर माती विभागातून साईनाथ रानवडे हे लढणार आहेत. 

अभिजित कटके
यासाठी खेळाडूंच्या निवड चाचणीचे आयोजन छत्रपती शिवाजी स्टेडीयम येथे करण्यात आले होते. या वेळी आंतरराष्ट्रीय कुस्ती मार्गदर्शक विलास कथुरे, माजी ऑलिम्पियन मारुती आडकर, भारतीय कुस्तीगीर महासंघाचे उपाध्यक्ष विजय बराटे, हिंदकेसरी अमोल बराटे, राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष दामोदर टकले, राष्ट्रीय तालीम संघाचे कार्याध्यक्ष हिंदकेसरी योगेश दोडके, राष्ट्रीय तालीम संघाचे विश्वस्त तात्यासाहेब भिंताडे, सचिव शिवाजीराव बुचडे, खजिनदार मधुकर फडतरे, सहसचिव गणेश दांगट, हेमेद्र किराड, अविनाश टकले, जिल्हा कुस्तीगीर संघाचे सचिव मोहन खोपडे, उपमहाराष्ट्र केसरी संतोष गरुड, पुणे शहराचे पंच प्रमुख रवी बोत्रे, राष्ट्रीय तालीम संघाचे कार्यकारिणी सदस्य निवृती मारणे, शामराव यादव आदी मान्यवर उपस्थित होते.

साईनाथ रानवडे
पुणे शहर संघातील कुस्तीपटूंची नावे याप्रमाणे आहेत. 
 
माती विभाग

५७ किलो : किरण शिंदे (गोकुळ वस्ताद तालीम)

६१ किलो : निखील कदम (गोकुळ वस्ताद तालीम)

६५ किलो : रावसाहेब घोरपडे (सह्याद्री संकुल)

७० किलो : अमर मते (हनुमान आखाडा)

७४ किलो : मंगेश दोरगे (खालकर तालीम)

७९ किलो : निखील उंद्रे (सह्याद्री संकुल)

८६ किलो : प्रदीप बेंद्रे (हिंदकेसरी आखाडा)

९२ किलो : हेमंत माझिरे (कुंजीर तालीम)

९७ किलो : दत्ता ठोंबरे (चिंचेची तालीम)

महाराष्ट्र केसरी ८६ ते १२५ किलो : साईनाथ रानवडे (मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल)

पुणे शहर संघ : गादी विभाग

५७ किलो : भालचंद्र कुंभार (हनुमान आखाडा)

६१ किलो : अनुदान चव्हाण (सह्याद्री संकुल)

६५ किलो : सागर खोपडे (मुकुंद व्यायामशाळा)

७० किलो : शुभम थोरात (शिवरामदादा तालीम)

७४ किलो : रवींद्र जगताप (गुलसे तालीम)

७९ किलो : वैभव तांगडे (हनुमान आखाडा)

८६ किलो : अमित पवळे (हनुमान आखाडा)

९२ किलो : अक्षय भोसले (शिवरामदादा तालीम)

९७ किलो : चेतन कंधारे (सह्याद्री संकुल)

महाराष्ट्र केसरी ८६ ते १२५ किलो : अभिजित कटके (शिवरामदादा तालीम) 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search