Next
‘असूस’तर्फे ‘स्ट्रिक्स जीएल७०२झेडसी’ची घोषणा
प्रेस रिलीज
Friday, March 16, 2018 | 05:09 PM
15 0 0
Share this story

मुंबई : असूस रिपब्लिक ऑफ गेमर्सने (आरओजी) जगातील पहिल्या एएमडी रिझेन तंत्रज्ञानाने युक्त अशा गेमिंग लॅपटॉपची घोषणा केली आहे. या लॅपटॉपमध्ये मल्टि-थ्रेडिंग तंत्रज्ञानाने युक्त असा एट-कोअर प्रोसेसर असून, यामुळे अखंडित गेमिंगचा अनुभव घेता येईल.

‘आरओजी स्ट्रिक्स जीएल७०२ झेडसी’च्या डिसप्लेसाठी एएमडीचे फ्रीसिंक तंत्रज्ञान वापरण्यात आल्यामुळे लॅपटॉपवर तसेच त्याला एचडीएमआय किंवा डिसप्ले पोर्टद्वारे जोडलेल्या अन्य मॉनिटर्सवर अत्यंत ओघवती चित्रे (व्हिज्युअल्स) दिसू शकतील. गेमर्ससाठी डिझाइन करण्यात आलेल्या ‘स्ट्रिक्स जीएल७०२झेडसी’मध्ये गेमिंग सेंटर आणि बॅकलिट कीबोर्डसाठी अँटी-घोस्टिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हा गेमिंग लॅपटॉप प्री-ऑर्डरसाठी फ्लिपकार्टवर एक लाख ३४ हजार ९९० रुपयांत उपलब्ध आहे.

‘आरओजी’ आणि ‘एएमडी’ यांच्यातील करारामुळे ‘स्ट्रिक्स जीएल७०२झेडसी’ हा जगातील पहिला गेमिंग लॅपटॉप ‘एएमडी रायझेन सेव्हन १७०० प्रोसेसर’वर आधारित आहे. आठ कोअर्स आणि १६ थ्रेड्स यांनी युक्त असलेल्या या प्रोसेसरमुळे ३.७ गिगाहर्ट्झ एवढा कमाल वेग शक्य झाला आहे. तीव्र स्वरूपाच्या गेमिंगसाठी तसेच उत्पादनक्षम गणनेसाठी अशाच प्रकारची कामगिरी लॅपटॉपकडून अपेक्षित असते.

‘स्ट्रिक्स जीएल७०२झेडसी’मध्ये ‘एएमडी राडिऑन आरएक्स ५८०’ ग्राफिक्स असून, यात चार जीबी ‘डीडीआर-५ व्हीरॅम’चा वापर करण्यात आला आहे. यात १७.३ इंचांचा पूर्ण एचडी, आयपीएस डिसप्ले असून, १७८ अंश रुंद व्ह्यूइंग अँगल्स आणि एएमडी फ्रीसिंक डिसप्ले तंत्रज्ञानाचा वापर यासाठी करण्यात आला आहे.

‘स्ट्रिक्स’मध्ये ‘आरओज’ गेमिंग सेंटर’ हा एक अनोखा डॅशबोर्ड असून, यामुळे गेमर्सना ‘आरओजी’ अॅप्लिकेशन्स सेटिंग मेन्यूमधून अॅक्सेस करता येतात. ‘आरओजी गेमफर्स्ट फोर’, ‘एक्सस्प्लिट गेमकास्टर’ या एकात्मिक अॅप्लिकेशन्ससोबत तसेच ‘असूस’च्या अद्भूत दृश्य तंत्रज्ञानासोबत हा डॅशबोर्ड काम करतो. बॅकलिट कीबोर्डमध्ये अँटी-घोस्टिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, यामुळे सर्व कीस्ट्रोक्सचा अर्थ तातडीने आणि अचूक लावला जातो.

‘असूस’चे नॅशनल बिझनेस विकास व्यवस्थापक (पीसी आणि गेमिंग) अरनॉल्ड स्यु म्हणाले, ‘जगभरातील चॅम्पियन्सना अत्युत्कृष्ट गेमिंग अनुभव देणे आणि उत्तम कामगिरी यासाठी ‘आरओजी’ने वाहून घेतले आहे. ‘एएमडी’च्या सहयोगाने तयार करण्यात आलेल्या ‘स्ट्रिक्स जीएल७०२झेडसी’ची भर आमच्या उत्पादनश्रेणीत पडली असून, भारतातील गेमिंग कम्युनिटीला गेमिंगचा सर्वात जबदरदस्त अनुभव देताना आम्हाला खूप आनंद होत आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link