Next
....आणि सापडले ‘मेघालय युग’
BOI
Thursday, July 19, 2018 | 06:00 PM
15 0 0
Share this story


एका अवघ्या नवीन युगाचा शोध लागणं, ही छोटी बाब नाही.. मागे इतिहासात होऊन गेलेल्या एका अनोख्या युगाचा शोध भू-शास्त्रज्ञांनी लावला आहे. विशेष बाब म्हणजे, या नव्याने शोध लागलेल्या युगाचा भारतातील ‘मेघालय’शी संबंध आहे. हा नव्या युगाचा शोध पृथ्वीच्या इतिहासातील एक महत्त्वाचा शोध समजला जात आहे. 

सुमारे चार हजार २०० वर्षांपूर्वीच्या कालखंडात संपूर्ण जगभर अचानक भीषण दुष्काळ पडला होता. अनेक ठिकाणच्या तपमानातही मोठ्या प्रमाणावर घट झाली होती. याचा परिणाम म्हणून अनेक संस्कृती नामशेष झाल्या होत्या. या सगळ्या घटनाक्रमाचे संदर्भ भारतातील ‘मेघालय’मध्ये संशोधकांना सापडले. त्यामुळे या युगाला ‘मेघालय युग’ असे नाव देण्यात आले आहे. 

असा लागला शोध – 
संशोधकांच्या एका आंतरराष्ट्रीय पथकाने या युगाचा शोध लावला आहे. पृथ्वीच्या इतिहासात आजवर घडलेल्या हवामानबदलाच्या घटनांपैकी ही सर्वांत लहान घटना आहे, असे म्हणता येऊ शकेल. मेघालयमधील एका गुहेत, त्या गुहेच्या छतातून खाली पडलेला चुन्याचा ढीग या संशोधकांच्या पथकाने जमा केला आणि त्याचा अभ्यास केला. यातून असा काही शोध लागेल, याबद्दल त्यांनी विचारही केला नसेल. या चुन्याच्या ढीगातून एका छोट्या हवामानबदलाच्या घटनेचा शोध लागला, याबद्दल या संशोधकांनी समाधान व्यक्त केले आहे. 

या नवीन युगाच्या शोधाच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीबद्दलच्या अनेक बाबी जाणून घेण्याची उत्सुकता वाढीस लागली आहे. जसे की, आपला हा आत्ताचा कालखंड कोणता? हे युग कोणतं? त्याचे शास्त्रीय नाव काय, वगैरे.. या आणि अशा काही गोष्टींची माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे. 

पृथ्वीला तब्बल ४.६ अब्ज वर्षांचा प्रदीर्घ इतिहास आहे. भूगर्भशास्त्रज्ञांनी या इतिहासाची काही कालखंडांमध्ये विभागणी केली आहे. ही विभागणी प्राणी व वनस्पती यांच्या प्रजाती, वातावरणातील बदल, हवामानातील बदल अशा काही महत्त्वपूर्ण घटनांवर आधारित करण्यात आली आहे. या प्रत्येक कालखंडात अशी काहीतरी महत्त्वपूर्ण घटना घडलेली आहे. आपण आज ज्या कालखंडात राहतो, या वर्तमान युगाला ‘होलोसीन युग’ म्हणून ओळखले जाते. या युगात ११ हजार ७०० वर्षांचा इतिहास सामावलेला आहे. या युगाच्या पूर्वी ‘हिमयुग’ होते. वातावरणात झालेल्या काही महत्त्वपूर्ण बदलांमुळे आपण या हिमयुगातून बाहेर पडलो आहोत. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
दत्तात्रय भोसले, रोपळे बुद्रूक About 218 Days ago
good news
0
0

Select Language
Share Link