Next
पुणे वुमन्स हाफ मॅरेथॉनमध्ये कविता रेड्डी विजयी
प्रेस रिलीज
Wednesday, March 13, 2019 | 04:23 PM
15 0 0
Share this story



पुणे : महिलांमध्ये आरोग्यविषक जागरुकता वाढावी म्हणून ‘फ्री रनर्स चॅरिटेबल ट्रस्ट’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या पुणे वुमन्स हाफ मॅरेथॉनमध्ये तब्बल साडेचार हजार महिलांनी सहभाग नोंदवत उत्तम आरोग्याचे महत्त्व पटवून दिले. यात २१ किलोमीटरच्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेत कविता रेड्डी यांनी, तर १० किलोमीटरच्या स्पर्धेत विनया मालुसरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. रेड्डी यांनी एक तास ३६ मिनिटे ३८ सेकंदात आपले २१ किमीचे लक्ष्य पूर्ण केले आणि मालुसरे यांनी ३९ मिनिट २३ सेकंदात १० किमीचे अंतर पार केले.

पोलीस अधीक्षक कार्यालयापासून या स्पर्धेला सुरुवात झाली. ‘माय रीव्होल्यूशन’ ही यंदाच्या हाफ मॅरेथॉनची मध्यवर्ती थीम होती. आर्मी वाइव्हज वेल्फेअर असोसिअशनच्या (एडब्ल्यूडब्ल्यूए) समन्वयक, ‘एडब्ल्यूडब्ल्यूए’ दक्षिण मुख्यालयाच्या प्रादेशिक अध्यक्षा नीना सैनी या प्रमुख पाहुण्या होत्या. त्यांच्या हस्ते चार किमी स्पर्धेसाठी हिरवा झेंडा दाखविण्यात आला. फिक्की लेडीज ओर्गनायझेशनच्या अध्यक्षा आणि फ्री रनर्स चॅरिटेबल ट्रस्टच्या सचिव संगीता लालवाणी यांनी २१ किमीच्या स्पर्धेला झेंडा दाखवला. ‘पुणे वुमन्स हाफ मॅरेथॉन २०१९’चे संचालक जावेद पानसरे यांनी १० किमीच्या स्पर्धेला झेंडा दाखवला.

२१ किमी स्पर्धेत हिमांगी गोडबोले (एक तास ५५ मिनिट ५९ सेकंद) व अर्चना ओक (एक तास ५७ मिनिट नऊ सेकंद) यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकाविला. १० किमी स्पर्धेत स्वाती बासू व्हानवडे (४० मिनिट १७ सेकंद) व यामिनी ठाकरे (४२ मिनिट ४८ सेकंद) यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकाविला.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link