Next
‘बीएमडब्ल्यू गोल्फ कप इंटरनॅशनल’ची सुरुवात
प्रेस रिलीज
Monday, February 11, 2019 | 04:05 PM
15 0 0
Share this article:



पुणे : बीएमडब्ल्यू इंडियातर्फे ‘बीएमडब्ल्यू गोल्फ कप इंटरनॅशनल २०१९’ या सर्वांत मोठ्या अमॅच्युअर गोल्फ टुर्नामेंटच्या भारत सत्राची सुरूवात आज पुणे येथे करण्यात आली. ही गोल्फ टुर्नामेंट भारतातील ११ शहरांतील गोल्फ कोर्सेसमध्ये आयोजित केली जाणार आहे.

या स्पर्धेत ५० देशांतील एक लाखांहून अधिक अमॅच्युअर गोल्फर्स सहभागी होणार असून, हे खेळाडू जगातील चांगल्या गोल्फ कोर्सेसवर ८००हून अधिक टुर्नामेंट्स खेळतील. आमंत्रितांसाठीच असलेल्या ‘बीएमडब्ल्यू गोल्फ कप इंटरनॅशनल’ या वैशिष्ट्यपूर्ण इव्हेंटमध्ये देशातल्या मान्यताप्राप्त, प्रसिद्ध गोल्फ क्लब्सचे सदस्य असलेले गोल्फर्सच सहभागी होऊ शकणार आहेत. भारतातील प्रत्येक शहरातील पात्रता टुर्नामेंटमध्ये विजयी ठरलेले खेळाडू अंतिम स्पर्धेत खेळण्यासाठी पात्र ठरतील. राष्ट्रीय विजेत्यांना ‘बीएमडब्ल्यू गोल्फ कप इंटरनॅशनल’च्या वर्ल्ड फायनलमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. ही अंतिम स्पर्धा जगातल्या सर्वांत सुंदर गोल्फ कोर्सेसवर खेळविली जाईल.



बीएमडब्ल्यू इंडियाचे डीलर्स आपापल्या बीएमडब्ल्यू ग्राहकांमधून या स्पर्धेत सहभागी होण्यास उत्सुक असलेले अमॅच्युअर गोल्फर्स शोधून काढणार आहेत. प्रत्येक स्थानिक गोल्फ क्लबच्या नियमांनुसार या टुर्नामेंट्स आयोजित केल्या जाणार आहेत. १२ वर्षांखालील हँडिकॅप्स, १३ ते २८ वर्षांदरम्यानचे हॅंडिकॅप्स आणि महिला (२८ वर्षांपर्यंतचे हॅंडिकॅप्स) या तीन प्रकारांत या स्पर्धा होतील.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search