Next
रत्नागिरीत उत्तरा केळकर यांची संगीत मैफल
वात्सल्य स्नेह पुरस्कारांचे वितरणही होणार
BOI
Thursday, November 01, 2018 | 10:46 AM
15 0 0
Share this story

रत्नागिरी : रत्नागिरीकरांना दोन नोव्हेंबर २०१८ रोजी ज्येष्ठ गायिका उत्तरा केळकर यांची मुलाखत व संगीत मैफलीचा आनंद लुटता येणार आहे. रत्नागिरीतील वात्सल्य स्नेह संस्थेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेतर्फे श्यामची आई अर्थात साने गुरुजींच्या आईच्या १०२व्या पुण्यतिथीनिमित्त वात्सल्य स्नेह पुरस्कारांचे वितरण केले जाणार असून, समाजोपयोगी कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्थेचा सत्कार या वेळी करण्यात येणार आहे.

दोन नोव्हेंबरला सायंकाळी साडेपाच वाजता रत्नागिरीतील थिबा पॅलेस रोडवरील जयेश मंगल पार्कमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रम सर्व रत्नागिरीकरांसाठी विनामूल्य आहे. सुरुवातीला ह. भ. प. किरण जोशी यांचे ‘वात्सल्यसिंधू आई’ या विषयावर व्याख्यान होईल. सहा वाजता एक संस्था आणि आणि ११ व्यक्तींचे प्रातिनिधिक सत्कार करण्यात येणार आहेत. या वेळी मुंबईच्या श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्सच्या प्राचार्या डॉ. वीणा प्रसाद प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असतील. अध्यक्षस्थानी मुंबईच्या केईएम हॉस्पिटलच्या मायक्रोबायोलॉजी विभागाचे अधिष्ठाता डॉ. मोहन करमरकर असणार आहेत. 
सायंकाळी साडेसहा वाजता गायिका उत्तरा केळकर यांची प्रकट मुलाखत निवेदिका निशा काळे व महेंद्र पाटणकर घेतील. केळकर या वेळी गाण्यांच्या आठवणी सांगणार आहेत. तसेच काही गीतेसुद्धा सादर करणार आहेत.

‘वात्सल्य स्नेह’ संस्थेची स्थापना २०१७मध्ये करण्यात आली. ‘वात्सल्य स्नेह’च्या माध्यमातून सुरू झालेली गुरुवर्य विश्वाराध्य उर्फ बाळासाहेब हिरमेठ परफॉर्मिंग आर्टस् अकादमी आता बाळसे धरीत आहे. ‘वात्सल्य स्नेह’चे अध्यक्ष अॅड. डॉ. संतोष शहा, कार्याध्यक्ष अॅड. राजशेखर मलुष्टे असून, कार्यवाह राजेंद्र पटवर्धन आहेत. कार्यक्रम यशस्वी संस्थेचे विश्वस्त आणि सर्व जण मेहनत करत आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link