Next
विकास पाटील देवसरकर काँग्रेसचे हिमायतनगर तालुकाध्यक्ष
नागेश शिंदे
Thursday, December 20, 2018 | 04:28 PM
15 0 0
Share this article:



हिमायतनगर :
काँग्रेस पक्षाच्या हिमायतनगर तालुकाध्यक्षपदी विकास पाटील देवसरकर यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या सूचनेनुसार आणि माजी आमदार माधवराव पाटील यांनी ही निवड जाहीर केली आहे.

अशोक चव्हाण नांदेड जिल्हा दौऱ्यावर असून, नांदेड जिल्ह्यातील संघटना मजबूत करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांचे अध्यक्ष व शहरांचे अध्यक्ष यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली आहे, असे नवनिर्वाचित अध्यक्ष विकास पाटील देवसरकर यांनी सांगितले.

हदगाव येथे होत असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीवर माधवराव पाटील यांचा वरचष्मा दिसून येईल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. विकास पाटील देवसरकर यांनी यापूर्वी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. ते संयमी व हुशार असल्यामुळे त्यांच्या गळ्यात तालुका अध्यक्षपदाची माळ टाकण्यात आली आहे. येणाऱ्या काळात हदगाव-हिमायतनगर मतदारसंघावर काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी जोमाने काम करणार असल्याचा मनोदय त्यांनी बोलून दाखवला आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search