Next
‘गोदरेज’तर्फे वॉशिंग मशीन्स निर्मितीला वेग
प्रेस रिलीज
Saturday, June 23, 2018 | 05:31 PM
15 0 0
Share this story

मुंबई : गृहोपयोगी वस्तूंच्या निर्मितीमध्ये अग्रेसर असलेल्या गोदरेज अप्लायन्सेस कंपनीतर्फे आता वॉशिंग मशीनच्या निर्मिती संख्येत वाढ केली जाणार असून, या कंपनीतर्फे आता दरवर्षी चार लाखांऐवजी सहा लाख वॉशिंग मशीन्सची निर्मिती करण्यात येणार आहे. ही वाढीव निर्मिती म्हणजे गेल्या वर्षी कंपनीतर्फे जाहीर करण्यात आलेल्या ४०० कोटी रुपयांच्या विस्तारीत योजनेचा एक भाग आहे. नवीन वॉशिंग मशीन निर्मिती यंत्रे मोहाली येथील प्लॅंटमध्ये उभारण्यात आली असून, त्याद्वारे विविध प्रकारच्या वॉशिंग मशीन निर्मितीला चालना मिळेल.

‘गोदरेज अप्लायन्सेस’तर्फे अलीकडच्या काळात ‘प्रीमियमसेशन’वर लक्ष केंद्रित करण्यात आले असून, गेल्या वर्षी ‘फ्रंट लोड वॉशिंग मशीन’च्या निर्मितीस प्रारंभ करण्यात आला. या मशीनमध्ये अॅलर्जीरोधक तंत्रज्ञान बसविण्यात आले आहे. नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब आणि आपल्या प्रॉडक्ट्समधील अत्याधुनिक फीचर्सद्वारे या ब्रॅंडने अत्याधुनिकरणावर भर दिला आहे. तसेच गोदरेज अप्लायन्सेसतर्फे ‘रोल्लर कोस्टर वॉश’ तंत्रज्ञान असलेले अॅल्युअर सीरिजमधील नवीन वॉशिंग मशीन सादर केले आहे; तसेच सेमी ऑटोमॅटिक विभागामध्ये वॉशिंग  मशीनची निर्मिती करणारा ‘गोदरेज’ हा असा पहिला ब्रॅंड आहे की, ज्याने स्ट्रील ड्रम असलेल्या मशीनची निर्मिती केली. विशेषत: वॉशिंग मशीन गटामध्ये या ब्रॅंडद्वारे आगामी काही महिन्यांमध्ये अशाच प्रकारची नवनवीन प्रॉडक्ट्सची प्रकल्पांमध्ये निर्मिती केली जाईल.

सध्या या प्रकल्पामध्ये १७ लाख रेफ्रीजरेटर्स, चार लाख सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन्स, तसेच रेफ्रीजरेटर्ससाठी लागणाऱ्या २७ लाख कॉम्प्रेसर्सची निर्मिती केली जाते. कंपनीच्या मोहाली आणि शिरवळ येथील प्रकल्पांमध्ये दरवर्षी ३० लाख रेफ्रीजरेटर्स, सहा लाख वॉशिंग मशीन्स आणि १.५ लाख एअरकंडीशनर्स निर्मिले जातात. अशाप्रकारे या प्रकल्पांमधील गृहोपयोगी वस्तूंच्या निर्मितीची संख्या ३७.५ लाखांवर जाऊन पोचली आहे. या नवीन निर्मितीमुळे अतिरिक्त १०० लोकांना रोजगार मिळणार आहे. त्यापैकी ७५ महिला असून, त्याच नवीन वॉशिंग मशीनच्या लाइनवर काम करणार आहेत.

‘गोदरेज अप्लायन्सेस’चे बिझनेस हेड आणि कार्यकारी उपाध्यक्ष कमल नंदी म्हणाले, ‘कल्पकता आणि ग्राहकांना मिळणारा आनंद-समाधान याच दोन गोष्टींना आम्ही सदैव प्राधान्य दिले असून, त्यामुळेच ग्राहक आमच्या ब्रॅंडवर विश्वास ठेवतात. वॉशिंग मशीन गटामध्ये सर्वाधिक प्रगती करणारा ब्रॅंड म्हणून आमची ओळख आहे. नवीन यंत्रणेमुळे आम्हाला वॉशिंग मशीन्सच्या निर्मितीमध्ये २५ टक्क्यांनी वाढ करणे शक्य होणार आहे. मोहाली येथील आमच्या नवीन असेम्ब्ली लाइनमध्ये वॉशिंग मशीन निर्मितीची संख्या दुप्पट करण्यात आली असून, दोन लाखांच्या जागी आता चार लाखांची मशीन्स निर्मिली जाणार आहेत. त्यामुळे आमच्या वार्षिक वॉशींग मशीन्स निर्मितीची संख्या सहा लाखांवर जाऊन पोचणार आहे. ‘गोदरेज अप्लायन्सेस’ ही कंपनी सध्या वेगवान वृद्धीप्रवास करीत आहे. २०२० अखेर भारतीय गृहोपयोगी वस्तूंच्या निर्मितीमध्ये पहिल्या तीन कंपन्यांमध्ये समाविष्ट होण्याचे या कंपनीचे ध्येय आहे.’

गोदरेज अप्लायन्सेसचे निर्मिती प्रमुख हुसेन शारीयार म्हणाले, ‘विविध गृहोपयोगी वस्तूंची निर्मिती करणे ही गोदरेज अप्लायन्सेसची महत्त्वाची शक्ती आहे. त्यामुळे आमच्या कंपनीला नुसताच नफा झालेला नसून आमची ब्रॅंड इमेजही वाढली आहे. शिरवळ आणि मोहाली येथील आमच्या प्रकल्पांनी या क्षेत्रामध्ये मोठी प्रतिष्ठा मिळवली असून त्यांना ‘सीआयआय’च्या प्लॅटिनम ग्रीन कंपनीचा दर्जा मिळाला आहे; तसेच या प्रकल्पांमधून एक मेगा व्हॅट क्षमतेची सौर ऊर्जा निर्मिली जाते. त्यामुळे आमच्या अक्षय ऊर्जेची निर्मिती ३० टक्क्यांवर जाऊन पोचली आहे; तसेच ऊर्जा निर्मितीची प्रगती पाहण्यासाठी या प्रकल्पामध्ये ऑनलाईन तपासणी व्यवस्था बसविण्यात आली आहे.’

गेल्या पाच वर्षांमध्ये ऊर्जेमध्ये ३० टक्क्यांची कपात करण्यात या कंपनीला यश आले आहे; तसेच ४४ टक्क्यांनी इंधनबचत करण्यात आली असून, ३६ टक्के पाणीबचत करण्यातही कंपनीला यश आले आहे. ३० टक्क्यांची बचत ही ‘जीएचजी एमिशन्स’मध्ये झाली आहे. मोहाली येथील प्रकल्पामध्ये पाऊस आणि जमिनीमधील पाण्याचा वापर करण्याची व्यवस्था आहे. या प्रकल्पामध्ये वापरण्यात येणारे रॉ मटेरियले ‘रिसायकलिंग’ करण्यात येते. या प्रकल्पामध्ये १०० आस्बियो इंधनाचाही उपयोग करण्यात येतो.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link