Next
‘ऑरो अॅव्हेन्यू’ला भरघोस प्रतिसाद
प्रेस रिलीज
Friday, September 14, 2018 | 04:16 PM
15 0 0
Share this article:

पुणे : कोलते पाटील डेव्हलपर्स लिमिटेड याच्या ‘ऑरो अॅव्हेन्यू’ या प्रकल्पाला भरघोस प्रतिसाद मिळाला. हा गृहप्रकल्प ऑगस्ट २०१८ रोजी सादर केल्यानंतर ५०० सदनिकाचे बुकिंग झाले असून, त्याचे मूल्य १८६ करोड रुपये झाले आहे.

लाइफ रिपब्लिक टाउनशिपचा एक प्रकल्प ‘ऑरो अॅव्हेन्यू’ हिंजेवाडी आयटी हबमध्ये आहे. यात २२ मजली उत्तुंग टॉवर्स आहेत आणि ७० टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्र बांधकाम मुक्त आहे. शिवाय ग्राहकांना २० पेक्षा जास्त जीवनशैली सुखसुविधा मिळू शकतात. ज्यामध्ये अरोमा गार्डन, पार्टी लॉन, क्रिकेट प्रॅक्टिस नेट, बास्केटबॉल कोर्ट, पाम कोर्ट, स्विमिंग पूल, स्केटिंग रिंक अशा अनेक सुविधांचा समावेश आहे.

कोलते पाटील डेव्हलपर्स ग्रुपचे सीईओ गोपाल सारडा म्हणाले, ‘ग्राहकांनी दिलेल्या या प्रतिसादामुळे आम्ही अत्यंत आनंदी आहोत. हा प्रकल्प रिअल इस्टेट क्षेत्रातला उल्लेखनीय प्रकल्प असून, कोलते पाटील होम्सबाबत लोकांच्या मनात काय भावना आहे हे दिसून येते. आमच्या प्रकल्पात फक्त पुण्यातल्या ग्राहकांनी गुंतवणूक केली नसून यामध्ये मुंबई व महाराष्ट्रासह काही ग्राहक हे परदेशातले आहेत.’

‘पुण्यातील इतर नवीन प्रकल्पांमध्ये ग्राहकांनी फक्त ४० दिवसांत आम्हाला इतका चांगला प्रतिसाद दिला आहे. कंपनीने दिलेल्या वेळेत काम पूर्ण करत असल्याचे हे फळ आहे. तसेच भविष्यात आम्ही याच आत्मविश्वासाने काम करू.’ असेही सारडा यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search