Next
शाह यांची टाटा व माधुरी दीक्षित यांच्याशी भेट
प्रेस रिलीज
Thursday, June 07 | 03:33 PM
15 0 0
Share this story



मुंबई : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी सहा जून रोजी मुंबईत प्रख्यात उद्योगपती रतन टाटा व चित्रपट अभिनेत्री माधुरी दीक्षित यांची सदिच्छा भेट घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला यशस्वीरित्या चार वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सरकारच्या कामगिरीची माहिती देण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे देशभर चालू असलेल्या ‘संपर्क से समर्थन’ अभियानाच्या अंतर्गत ही भेट घेण्यात आली.

या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे, भाजप राष्ट्रीय सरचिटणीस सरोज पांडे व डॉ. अनिल जैन, शिक्षणमंत्री विनोद तावडे व डॉ. श्रीराम नेने उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link