Next
महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर
प्रेस रिलीज
Friday, February 22, 2019 | 05:16 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या हिंदी साहित्य अकादमीद्वारे सन २०१७-१८ या वर्षासाठीचे पुरस्कार २१ फेब्रुवारी २०१९ रोजी जाहीर करण्यात आले. अकादमीतर्फे तीन प्रकारचे पुरस्कार दिले जातात. या वर्षी देण्यात येणाऱ्या पुरस्कारांमध्ये दोन अखिल भारतीय सन्मान जीवनगौरव पुरस्कार, आठ राज्यस्तरीय सन्मान जीवनगौरव पुरस्कार आणि २० विधा पुरस्कार अशा एकूण ३० पुरस्कारांचा समावेश आहे.

अकादमीतर्फे हा पुरस्कार प्रदान सोहळा एक मार्च २०१९ रोजी सायंकाळी सहा वाजता चर्चगेट येथील रामा आणि सुंदरी वाटुमल ऑडिटोरिअम येथे आयोजित केला आहे. महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीतर्फे हिंदी भाषा व साहित्याच्या ‍विकासासाठी कार्यरत साहित्यिकांना पुरस्कृत करण्याकरिता दर वर्षी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येतो.

या वर्षी अखिल भारतीय सन्मान जीवनगौरव पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र भारती अखिल भारतीय हिंदी सेवा पुरस्कार रंगनाथ तिवारी, तसेच डॉ. राममनोहर त्रिपाठी अखिल भारतीय हिंदी सेवा पुरस्कार रामेश्वरनाथ मिश्र यांना प्रदान केला जाणार आहे. राज्यस्तरीय सन्मान जीवनगौरव पुरस्कारांतर्गत प्रेम शुक्ल यांना छत्रपती शिवाजी राष्ट्रीय एकता पुरस्कार, मंजू लोढा यांना साने गुरूजी राष्ट्रीय एकता पुरस्कार, डॉ. तेजपाल चौधरी यांना पद्मश्री अनंत गोपाल शेवडे हिंदी सेवा पुरस्कार, पूजाश्री यांना डॉ. उषा मेहता हिंदी सेवा पुरस्कार, सुधीर ओखदे यांना गजानन माधव मुक्तिबोध मराठी भाषी हिंदी लेखक पुरस्कार, माणिक बाबुराव मुंडे यांना कांतीलाल जोशी इतर हिंदी भाषी हिंदी लेखक पुरस्कार, डॉ. विनोद नारायण इंदुरकर यांना व्ही शांताराम ललित कला हिंदी विशिष्ट सेवा पुरस्कार, डॉ. श्रीभगवान तिवारी यांना सुब्रमण्य भारती हिंदी सेतू विशिष्ट सेवा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

‘विधा’ पुरस्कारांतर्गत ‘काव्य’ या विधासाठी देण्यात येणारा संत नामदेव पुरस्कार शीतला पांडेय-समीर (अनजान) यांना सुवर्ण, श्रीमती सुधा राठौर यांना रजत, तसेच डॉ. मुकेश गौतम यांना कांस्य पुरस्कार देण्यात येणार आहे. ‘कहानी’ या विधासाठी देण्यात येणारा मुंशी प्रेमचंद पुरस्कार मंजुळा जोशी यांना सुवर्ण, कृष्ण नागपाल यांना रजत, डॉ. शशी वर्धन शर्मा (शैलेश) यांना कांस्य पुरस्कार देण्यात येणार आहे. ‘निबंध’ या विधासाठी देण्यात येणारा आचार्य रामचंद्र शुक्ल पुरस्कार प्रभा मेहता यांना सुवर्ण, शिव प्रसाद तिवारी यांना कांस्य पुरस्कार देण्यात येणार आहे. ‘समीक्षा’ या विधासाठी देण्यात येणारा आचार्य नंददुलारे वाजपेयी पुरस्कार डॉ. मजीद शेख यांना सुवर्ण, डॉ. पंडित बन्ने यांना रजत, डॉ. शशिकांत सोनवणे (सावन) यांना कांस्य पुरस्कार देण्यात येणार आहे.

‘अनुवाद’ या विधासाठी देण्यात येणारा मामा वरेरकर पुरस्कार कुमुद संघवी-चावरे यांना सुवर्ण व रासबिहारी पाण्डेय यांना, ‘वैज्ञानिक तकनीकी’ विधासाठी दिला जाणारा होमी जहांगीर भाभा कांस्य पुरस्कार मुकेश पंड्या यांना देण्यात येणार आहे. ‘हिंदी भाषा, भाषा शास्त्र तथा व्याकरण संबंधी लेखन’ या विधासाठीचा पं. महावीर प्रसाद द्विवेदी कांस्य पुरस्कार डॉ. दिनेश प्रताप सिंह यांना, तर ‘नाटक’ या विधीसाठीचा विष्णुदास भावे स्वर्ण पुरस्कार डॉ. मधुकर राठोड यांना दिला जाणार आहे. ‘जीवनी-परक साहित्य’ या विधासाठीचा काका कालेलकर रजत पुरस्कार डॉ. जितेंद्र पांडेय यांना, ‘पत्रकारिता-कला’ विधाचा बाबुराव विष्णू पराडकर कांस्य पुरस्कार अनुप श्रीवास्तव यांना, ‘लोकसाहित्य’ विधाचा फणीश्वरनाथ रेणू स्वर्ण पुरस्कार निर्मला डोसी यांना आणि ‘बालसाहित्य’ विधासाठीचा सोहनलाल द्विवेदी कांस्य पुरस्कार नीलम सक्सेना (चंद्रा) यांना दिला जाणार आहे.

सर्व पुरस्कार विजेत्यांना अकादमीकडून स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व रोख रक्कम दिली जाते. अखिल भारतीय सन्मान जीवनगौरव पुरस्कारासाठी एक लाख रुपये, राज्यस्तरीय सन्मान जीवनगौरव पुरस्कारासाठी ५१ हजार रुपये आणि विधा पुरस्कारासाठी स्वर्ण, रजत, कांस्य अशा तीन प्रकारांत अनुक्रमे ३५ हजार, २५ हजार आणि आणि ११ हजार रुपये रोख देण्यात येतात.

कार्यक्रमाविषयी :
दिवस :
एक मार्च २०१९
वेळ : सायंकाळी सहा वाजता
स्थळ : रामा आणि सुंदरी वाटुमल ऑडिटोरिअम, के. सी. कॉलेज, चर्चगेट, मुंबई.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search