Next
फिटनेस जागरूकतेसाठी स्क्वॉट्सतर्फे वॉकेथॉन
प्रेस रिलीज
Tuesday, August 21, 2018 | 02:17 PM
15 0 0
Share this article:


पुणे : नागरिकांमध्ये फिटनेसबद्दल जागरूकता वाढविण्याच्या उद्देशाने येथील ऑनलाइन फिटनेस कन्सल्टेशन मंच ‘स्क्वॉट्स’ने नुकतेच लिफ्ट-ए-थॉन या एका वॉकेथॉनचे आयोजन केले होते. स्क्वॉट्सचे संस्थापक जितेंद्र चोक्सी यांनी झेंडा दाखवून या वॉकेथॉनची सुरूवात केली. या सहा किलोमीटरच्या वॉकमध्ये दोनशेहून अधिक नागरिक उत्साहाने सहभागी झाले होते. 

झेंडा दाखवून वॉकेथॉनचा प्रारंभ करताना स्क्वॉट्सचे संस्थापक जितेंद्र  चोक्सी.
आता फिटनेस आणि आरोग्य यांचा गंभीरपणे विचार करू लागलेल्या भारतीय समुदायास नजरेपुढे ठेवून, क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी सुरू केलेल्या ‘हम फिट तो इंडिया फिट’ अभियानाशी सुसंगत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वेटलिफ्टिंगबाबत असलेले गैरसमज दूर करून, योग्य माहितीचा प्रचार करण्यासाठी ‘स्क्वॉट्स’ने नेहमी प्रयत्न केला आहे. या लिफ्ट-ए-थॉनच्या माध्यमातून वेटलिफ्टिंग, योग्य आहार यांचे लाभ आणि तंदुरुस्त जीवनशैली अंगिकारण्याबाबतची जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search