Next
‘व्होडाफोन’ व ‘व्हिसा’तर्फे ‘आय-रोमफ्री’साठी ऑफर
प्रेस रिलीज
Tuesday, June 05, 2018 | 04:52 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘व्होडाफोन’ आणि ‘व्हिसा’ या दोन कंपन्यांनी एकत्र येत आंतरराष्ट्रीय रोमिंग सुरळीत व स्वस्त केले आहे. ‘व्होडाफोन’च्या पोस्टपेड ग्राहकांनी ‘व्हिसा’चे ट्रॅव्हल प्रीपेड कार्ड वापरल्यास, त्यांना त्यावर ५०० ते ७५० रुपयांची सूट मिळणार आहे. या कार्डांची वैधता १० ते २८ दिवस अशी अनुक्रमे आहे.

‘व्होडाफोन आय-रोमफ्री’ हा प्लॅन ६५ देशांमध्ये लागू आहे. २८ दिवसांच्या या प्लॅनची किंमत पाच हजार रुपये आहे. व्हिसा ट्रॅव्हल प्रीपेड कार्डधारकांना या व्होडाफोनच्या प्लॅनमध्ये ७५० रुपयांची सूट मिळेल. म्हणजे हा प्लॅन व्होडाफोनच्या ग्राहकांना केवळ चार हजार २५० रुपयांत उपलब्ध होईल. ‘व्होडाफोन आय-रोमफ्री’ हा प्लॅन १० दिवसांसाठीही आहे. त्याची किंमत तीन हजार ५०० रुपये असून व्हिसा ट्रॅव्हल प्रीपेड कार्डधारकांना या प्लॅनवर ५०० रुपयांची सूट मिळून तो त्यांना केवळ तीन हजार रुपयांना उपलब्ध होईल.

अमेरिका, युरोप, संयुक्त अरब अमिराती (यूएई), ब्रिटन, सिंगापूर, थायलंड, मलेशिया, न्युझीलंड या देशांमध्ये या प्लॅननुसार अमर्यादीत सर्व कॉल्स व डाटा मिळतील; तसेच इतर ४५ देशांमध्ये अमर्यादीत मोफत इनकमिंग कॉल्स व डाटा मिळतो. इतकेच नव्हे, तर ग्राहकांना परदेशांत प्रवास करताना काही अडचण आल्यास, त्यांना ग्राहक सेवा केंद्राशीदेखील मोफत बोलता येणार आहे.

परदेशात प्रवास करणार्‍या व्होडाफोनच्या ग्राहकांना ‘व्होडाफोन आय-रोमफ्री प्लॅन’ घेण्याचे आवाहन करताना  ‘व्होडाफोन इंडिया’चे कन्झ्युमर बिझनेस विभागाचे असोसिएट संचालक अवनीश खोसला म्हणाले, ‘व्होडाफोन आय-रोमफ्री प्लॅन’मुळे ग्राहकांना दरांमध्ये अनन्यसाधारण सूट, वेगवान सेवेचा अनुभव, चिंतामुक्त स्वरूपाचे रोमिंग आणि अत्युत्तम कनेक्टिव्हिटी मिळते. ‘व्हिसा’च्या सहकार्यामुळे आमचा ‘व्होडाफोन आय-रोमफ्री’ हा आतापर्यंतचा ‘अत्युत्कृष्ट आंतरराष्ट्रीय रोमिंग प्लॅन‘ बनला आहे. त्यामुळे आता एखाद्याला युरोपमध्ये भ्रमंती करायची असेल किंवा कुटुंबियांना भेटण्यासाठी अमेरिकेला जायचे असेल, दुबईला शॉपिंग करायचे असेल अथवा व्यावसायिक बैठकीसाठी सिंगापूरला जायचे असेल, तर त्याला सर्वत्र मोबाईलवर मोफत कॉल्स आणि जगातील सर्वोत्कृष्ट ट्रॅव्हल प्रीपेड कार्ड यांचा एकत्रित आनंद घेता येणार आहे.’

‘व्हिसातर्फे नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार, परदेशी गेलेल्या भारतीय नागरिकांपैकी ९७ टक्के जणांना इंटरनेटचा वापर करायचा असतो. हे प्रमाण इतर देशातील नागरिकांपेक्षा जास्त आहे. ‘व्होडाफोन’शी आमच्या भागीदारीमुळे हे नागरिक आता परदेशी असतानादेखील भारतातील आपल्या नातलगांच्या व मित्रांच्या संपर्कात कितीही वेळ राहू शकतील,’ असे प्रतिपादन व्हिसा कंपनीचे भारतातील उपाध्यक्ष व ग्राहक सेवा विभागाचे प्रमुख मुरली नायर यांनी केले आहे.

‘व्होडाफोन आय-रोमफ्री प्लॅन’ हा व्होडाफोनच्या प्रीपेड ग्राहकांसाठीदेखील लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link