Next
ठाणेकर रसिकांनी अनुभवली सुरेल संगीत मैफल
प्रशांत सिनकर
Friday, July 26, 2019 | 05:15 PM
15 0 0
Share this article:


ठाणे : प्रसिद्ध तबलावादक संतोष आगटे यांच्या वतीने ‘वलय ताल सप्तक’ या सुरेल मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. ठाण्यातील सहयोग मंदिर सभागृहात रंगलेल्या या मैफलीत शास्त्रीय संगीत फ्युजनचा आनंद रसिक-प्रेक्षकांनी घेतला.

शास्त्रीय संगीत म्हणजे सूर आणि लयीचा मिलाफ. मनाच्या कॅनव्हासवर उमटणाऱ्या अमूर्त भावनांना अभिव्यक्त करण्यासाठी शास्त्रीय संगीत हे उत्तम साधन आहे. रसिक मनाच्या असलेल्या ठाणेकरांना शास्त्रीय संगीतामुळे नेहमीच उभारी मिळते. संतोष आगटे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही मैफल विलक्षण रंगली. आगटे यांच्या शिष्यांनी तबलावादन सादर केले.


गिटार व बासरीवर प्रमोद अडसूळे आणि अमीन खान यांनी हिंदी गाणी सादर केली. श्रुती साटम, अनुजा मटकर, परेश भालेराव या गायकांनी ‘मलमली तारुण्य..’, ‘आली हसत पहिली रात्र..’, ‘ये जिवलगा..’ तसेच अरुण दाते यांचे गाजलेले ‘दिल्या घेतल्या वचनांची शपथ..’, अशी एकपेक्षा एक अजरामर गीते सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. या गीतांच्या सादरीकरणामध्ये तबलावादक संतोष आगटे यांनी तबल्यावर साथ केली. 

या वेळी नगरसेविका प्रतिभा मढवी, भाजपा ठाणे शहर उपाध्यक्ष डॉ राजेश मढवी, शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते विलास जोशी आदि मान्यवर उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search