Next
भाजप प्रदेश सरचिटणीसपदी सुरेश हाळवणकर
प्रेस रिलीज
Friday, November 17 | 06:01 PM
15 0 0
Share this story

सुरेश हाळवणकरमुंबई : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे यांनी आमदार सुरेश हाळवणकर यांची प्रदेश सरचिटणीस म्हणून नियुक्ती केली आहे.
 
आमदार हाळवणकर विधानसभेत कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांना भाजपच्या संघटनात्मक कार्याचा प्रदीर्घ अनुभव असून, त्यांनी ‘भाजयुमो’चे इचलकरंजी शहराध्यक्ष, इचलकरंजी शहराध्यक्ष, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष या पदांवर काम केले आहे.

१९९५मध्ये ते प्रथम नगरसेवक म्हणून निवडून आले. २००४मध्ये इचलकरंजीचे उपनगराध्यक्ष झाले. त्यानंतर २००९ व २०१४च्या निवडणुकीत सलग दोन वेळा इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. इचलकरंजीतील यंत्रमागधारकांना विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी त्यांनी आंदोलनांचे नेतृत्व केले होते.

कष्टकरी, शेतकरी व कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी  हाळवणकर यांनी आंदोलनेही केली होती. ते इचलकरंजीच्या लोटस टेक्स्टाईल पार्कचे संस्थापक तसेच स्वामी विवेकानंद यार्न डाईंग प्रोसेसर्सचेही संस्थापक चेअरमन आहेत. १९९५ ते १९९९ या कालावधीत त्यांनी महाराष्ट्र वस्त्रोद्योग महामंडळाचे सदस्य म्हणून काम केले होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link