Next
‘दासदेव’ प्रदर्शित होणार २० एप्रिलला
प्रेस रिलीज
Monday, April 16, 2018 | 05:41 PM
15 0 0
Share this storyमुंबई : ‘प्रेमाखेरीज सर्व काही निश्‍चित केले जाऊ शकते; मात्र प्रेम कधीच नाही...’ या टॅगलाईनसह सुधीर मिश्राच्या ‘दासदेव’ची कहाणी येत्या २० एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित होईल. हा चित्रपट म्हणजे गाजलेल्या ‘देवदास’ या विख्यात प्रेमकहाणीचा एक वेगळा पैलू असल्याचे म्हटले जात आहे.

या प्रेमकथेला राजकीय पार्श्वभूमी असल्याने कथेला एक वेगळेच परिमाण मिळत आहे. एका अर्थाने हा ‘देवदास’चा रिव्हर्स ‘दासदेव’ आहे. ‘दासदेव’ या चित्रपटात राहुल भट ‘देव’च्या भूमिकेत दिसेल, तर रिचा चढ्ढा ‘पारो’च्या आणि अदिती राव हैदरी ही चांदणीच्या (चंद्रमुखी) भूमिकेत दिसतील; तसेच सौरभ शुख्ला, विपिन शर्मा, दलिप तहिल, दीप राज राणा, अनिल शर्मा आणि सोहेला कपूर, अशी तगडी सहाय्यक अभिनेत्यांची फौजही या सिनेमात दिसेल.

या चित्रपटात अनुराग कश्‍यप आणि विनीत सिंग विशेष भूमिकेत (स्पेशल ऍपिअरन्स) दिसतील. ‘दासदेव’च्या पहिल्या ट्रेलरला हजारो व्ह्यूज मिळाले असून, हा ट्रेलर सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. हा प्रतिसाद पाहूनच ‘दासदेव’च्या निर्मात्यांनी नुकताच त्यांच्या नवीन ट्रेलरचे अनावरण केले आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या कथेविषयी प्रेक्षकांमध्ये जास्तच उत्सुकता निर्माण झाली आहे.

नुकत्याच एका कार्यक्रमात ‘दासदेव’ची कथा सांगणाऱ्या एका मजेदार रॅप गाण्याचा व्हिडिओ सुधीर मिश्रा यांच्या आवाजात प्रसिद्ध करण्यात आला. ज्यामध्ये सुधीर मिश्रा आणि सौरभ शुखला ही दिग्दर्शक-अभिनेत्याची जोडी, या चित्रपटाची आगळीवेगळी कथा सांगताना दिसत आहे.

तसेच निर्मात्यांनी राहुल भट, रिचा चढ्ढा आणि अरको मुखर्जी यांचा चित्रपटातील ‘रंगदारी’ या गाण्यावरील एक प्रचारात्मक संगीत व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. हे गीत अरको मुखर्जी यांनी संगीतबद्ध केले असून, त्यासाठी अरको मुखर्जी आणि नवराज हंस यांनी आपला आवाज दिला आहे. हे गीत देव आणि पारो यांच्या ज्वलंत नात्याला उत्कटतेने प्रदर्शित करते, असा हा एक शैलीदार आणि आकर्षक व्हिडिओ आहे.

‘दासदेव’ या आपल्या नव्या चित्रपटाबद्दल बोलताना सुधीर मिश्रा म्हणाले की, ‘माझ्या कथा सांगण्याने रिव्हर्स स्पिन घेतला असेल आणि शेक्‍सपियरने माझ्या विचारांवर प्रभाव टाकला असावा; परंतु या सर्व प्रक्रियेमध्ये जे अबाधित राहिले ती प्रेमाची भावना आहे. म्हणून आपण देवदासला कोणत्याही स्वरूपात व्यवहार करत असल्यास पाहिले, तरी प्रेमाच्या भावनेत फेरबदल केला जाऊ शकत नाही. म्हणूनच या कथेमध्ये मी एक राजकीय पार्श्‍वभूमी वापरली आहे. यात एक राजघराणे असून, या घराण्याला सत्तेचे व्यसन आहे. चित्रपटात अनेक स्तर आहेतच. ‘देवदास’मधील पात्रांना तोंड द्यावे लागणारी दुःख आणि ‘दासदेव’मध्ये आढळणारा दु:खाचा स्तर, यामध्ये कुठेही वेगळेपणा नाही. प्रसंग आणि परिस्थिती हे निराळे असू शकतात, मात्र दु:ख नाही.

‘दासदेव’मध्ये एकूण सात गाणी आहेत. अरको मुखर्जी, विपिन पटवा, संदेश शांडिल्य, अनुपमा राग आणि शामीर टंडन यासारख्या अष्टपैलू संगीत दिग्दर्शकांनी या चित्रपटासाठी एकत्र काम केले आहे. स्वानंद किरकिरे, आतीफ असलम, अरको मुखर्जी, नवराज हंस, रेखा वर्धवाज, जावेद बशीर, शारदा मिश्रा, पापण आणि कृष्णा बेरुआ यासारख्या कसदार गायक आणि गायिकांनी ‘दासदेव’साठी गायन केले आहे.

‘दासदेव’ हे भारतीय साहित्यातील एक महाकाव्यच मानले जात असून, या कथेच्या वेगळ्या आणि आपल्या सादरीकरणामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. देव (राहुल भट) आपल्या व्यसनांविरूद्ध लढतो आणि या चित्रपटात व्यसन केवळ मदिरा नसून ती एक शक्ती आहे. पारो (रिचा चढ्ढा) आपल्या पतीच्या घराच्या दरवाजाच्या मागे राहून देवची भेट घेते आणि चांदनी (अदिति राव हैदरी) आपली आधुनिक महत्त्वाकांक्षा बाळगून आधुनिक काळातील राजकीय फिक्‍सर, देणगीदार आणि स्वत:विषयी आत्मविश्‍वास असलेली एक प्रभावी स्त्री आहे. चंद्रमुखीइतकेच देववर तिचेही प्रेम आहेच. सप्तर्षी सिनेविजनचे संजीव कुमार निर्मित, गौरव शर्मा यांच्या स्टॉर्म पिक्‍चर्सद्वारा सादर करण्यात येत असलेला ‘दासदेव’ येत्या २० एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link