Next
‘डब्ल्यूएस बेकर्स’चे महाराष्ट्रभरात ५० फ्रँचायझींचे लक्ष्य
प्रेस रिलीज
Monday, September 24, 2018 | 04:33 PM
15 0 0
Share this story

पुणे : येथील डब्ल्यूएस फूड्स प्रायव्हेट लिमिटेडने डब्ल्यूएस बेकर्स या शुद्ध शाकाहारी आणि अंडीरहित बेकरी आणि कन्फेक्शनरी उत्पादनांच्या ब्रँडसाठी वाढीच्या योजना जाहीर केल्या. या कंपनीने मागील वर्षभराच्या काळात मोठे रिब्रँडिंग आणि पुनर्रचना उपक्रम हाती घेतले असून, पुण्याबाहेर विस्तार करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत.

पश्चिम महाराष्ट्रातील कार्य सुरू करून कंपनीने देशातील आघाडीच्या शुद्ध शाकाहारी आणि अंडीरहित बेकरी आणि कन्फेक्शनरी ब्रँड म्हणून पुढे येण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाऊल उचलले आहे. या कंपनीने आपले सेटअप सातारामध्ये सुरू केले. आता उर्वरित महाराष्ट्रात ५० पेक्षा जास्त आउटलेट्सवर लक्ष्य केंद्रित करत आहे. त्यांची मुख्य आउटलेट्स कोल्हापूर, सातारा, सांगली, कराड, नाशिक, ठाणे, नवी मुंबई, औरंगाबाद, नागपूर आदी ठिकाणी असणार आहेत. कंपनीतर्फे नवी मुंबई, सातारा, नाशिक आणि नागपूर येथे पुढील दोन ते तीन महिन्यांमध्ये सेंट्रल किचन तयार करणार असून, त्यातून ग्राहकांना ताजी उत्पादने दिली जातील. पुण्याबाहेरील असे पहिले सेंट्रल किचन या वर्षाच्या शेवटापर्यंत सातारा येथे सुरू होणार आहे.

कंपनीची मुख्य बाजारपेठ असलेल्या पुण्यात या कंपनीने मोठ्या प्रमाणावर फ्रँचायझी नेमण्यास सुरूवात केली आहे आणि कामगिरी चांगली नसलेली आउटलेट्स बंद करण्यास आणि बाजार संशोधनातून आलेल्या माहितीच्या आधारे नवीन फ्रँचायझी नेमण्यास सुरूवात केली आहे. त्यांनी पुणे विभागात (पीसीएमसीसह) आपले ७० वे आउटलेट सुरू केले आहे.

आपल्या योजनांबाबत सांगताना ‘डब्ल्यूएस फूड्स’चे संचालक सुदेश अग्रवाल म्हणाले, ‘आम्ही सुमारे दोन वर्षांपूर्वी हा ब्रँड ताब्यात घेतला तेव्हा तो कठीण परिस्थितीतून चालला होता आणि त्याला उत्पादन, ब्रँड, संस्था आदी पातळ्यांवर काही गंभीर पुनर्रचनेची गरज होती. त्यावेळी अभ्यास आणि तपासणीनंतर आमच्या हे लक्षात आले की, या ब्रँडला बाजारात खूप संधी आहेत आणि त्यांच्या लक्ष्याधारित ग्राहकांमध्ये खूप मागणी आहे; परंतु त्यात वेगाने बदल करण्याची गरज आहे आणि ताजेपणा आणणे आवश्यक आहे. मागील १२ ते १८ महिन्यांत आम्ही तेच केले आणि आता आम्ही प्रवासाच्या पुढील टप्प्यासाठी सज्ज आहोत, तो म्हणजे भारतातील आघाडीचा शुद्ध शाकाहारी बेकरी आणि कन्फेक्शनरी ब्रँड म्हणून उभे राहणे.’

‘आमच्या व्यवस्थापनाचे असे स्पष्ट मत आहे की, आमचे वाढीचे मॉडेल स्थिर आणि शाश्वत असले पाहिजे आणि त्यासाठी दर्जा आणि समाधानाबाबत तडजोड करणे योग्य ठरणार नाही. ‘डब्ल्यूएस’ला आमच्या प्रत्येक ग्राहकासाठी ‘वे टू हॅप्पीनेस’ महत्त्वाचा वाटतो. आम्ही आमच्या राष्ट्रीय स्तरावरील विस्ताराच्या योजना या मूलभूत खांबांभोवती बांधलेल्या आहेत आणि त्यामुळे सर्वप्रथम आपण महाराष्ट्रामधील, आपल्या मुख्य राज्यातील विस्तारावर लक्ष केंद्रित केले पाहिजे’, असे मत अग्रवाल यांनी व्यक्त केले.

डब्ल्यूएस बेकर्सकडून मागील तीन वर्षांपासून लोकांना एकत्र जोडून त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले जाते. पेस्ट्री आणि कन्फेक्शनरीची पुणे येथे स्थित असलेली ही ख्यातनाम साखळी असलेल्या डब्ल्यूएस बेकर्सने जास्तीत जास्त लोकांना एकत्र आणून सुमारे चार वर्षांपूर्वी तिच्या स्थापनेपासून त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले आहे. ती आपल्या चाहत्यांना विविध प्रकारचे खास बेक केलेले, शुद्ध शाकाहारी अंडीरहित केक, पेस्ट्री आणि डेझर्ट्स तसेच विविध प्रकारची कस्टमाइज्ड पॅकेजेस पुणे, पीसीएमसी आणि आता सातारा येथील ७० आउटलेट्सच्या माध्यमातून देत आहे.

ग्राहक आपल्या ऑर्डर्स कंपनीचे ई-वाणिज्य प्लॅटफॉर्म किंवा तिने भागीदारी केलेल्या तृतीय पक्ष एफअँडबी प्लॅटफॉर्मद्वारे ऑनलाइन नोंदवू शकतात.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link