Next
पिंपरी-चिंचवडमधील ‘जंगल बचाव’ देखावा सर्वांचे आकर्षण
BOI
Wednesday, September 04, 2019 | 04:20 PM
15 0 0
Share this article:


पिंपरी-चिंचवड : सध्या घरोघरी गणपतीबाप्पाचे आगमन झाले असून, त्याच्या स्वागतासाठी आकर्षक सजावट करण्यात आली आहे. सामाजिक संदेश देणाऱ्या घरगुती देखाव्यांचीही चर्चा आणि कौतुक होत आहे. पिंपरी-चिंचवडमधील पर्यावरणप्रेमी प्रभाकर पवार यांनी केलेला पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा देखावाही चर्चेचा विषय ठरला आहे. 

प्रभाकर पवार
अॅमेझॉनच्या जंगलात लागलेल्या भीषण आगीमुळे पर्यावरणाच्या होत असलेल्या अपरिमित नुकसानाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न पवार यांनी या देखाव्यातून केला आहे. त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने कागदांचा वापर करून जंगल, तिथे राहणारे प्राणी साकारले असून, पर्यावरण वाचवण्यासाठी जंगल वाचणे गरजेचे आहे, असा संदेश त्यातून दिला आहे. देखावा बघण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. 

या देखाव्यामागची भूमिका स्पष्ट करताना प्रभाकर पवार म्हणाले, ‘जगाचे फुफ्फुस असलेले अॅमेझॉनचे जंगल जळत असल्याच्या बातम्या आपण सध्या ऐकतो आहोत. अनेक देश ही आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यामुळे होणारे नुकसान कधीही भरून न येणारे आहे. आपल्या देशातही अनेकदा जंगलात, डोंगरावर वणवे लावण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे प्राण्यांचा अधिवास नष्ट होतो, निसर्गाचे चक्र असंतुलित होते. याचा परिणाम मानव जातीलाच भोगावा लागणार आहे. पुढच्या पिढ्यांना आपण काय देणार आहोत, याचा विचार करणे गरजेचे आहे. जंगल वाचवणे अत्यंत आवश्यक आहे. हाच संदेश देण्यासाठी कागदांपासून जंगलाचा देखावा तयार केला असून, गणपतीबाप्पाची मूर्तीही शाडू मातीची आहे. हा देखावा लोकांना आवडत आहे, हे बघून आनंद होत आहे.’


(प्रभाकर पवार यांनी केलेल्या पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या देखाव्याची झलक दाखविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search