Next
धरण संजीवन परिषदेचे शनिवारी आयोजन
राज्यातील धरणांमधील गाळ काढण्याचा उपक्रम
BOI
Friday, January 04 | 02:27 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘नाम फाउंडेशन आणि ग्रीन थंब संस्थेच्या वतीने राज्यातील प्रमुख धरणांमधील गाळ काढण्याचे अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानाबाबत माहिती देण्याकरता शनिवारी, पाच जानेवारी २०१९ रोजी पुण्यातील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात दुपारी १२ ते दोन या वेळेत ‘धरण संजीवन परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे’, अशी माहिती ‘ग्रीन थंब’ संस्थेचे अध्यक्ष निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. 

‘धरण संजीवन अभियानाची सुरुवात पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरणापासून करण्यात आली आहे. या धरणाची साठवण क्षमता चार लाख टीएमसी इतकी असून, गाळ साठल्याने ती फक्त दीड टीएमसी झाली आहे. राज्यातील अन्य धरणांचीही हीच अवस्था आहे. पाणीटंचाईचे संकटही भेडसावत असते. यावर उपाय म्हणून धरणातील गाळ काढून धरणाची पाणी साठवण क्षमता वाढवण्याचा उपक्रम या हाती घेण्यात आला आहे’, असेही पाटील यांनी म्हटले आहे. 

लोकसहभागातून राज्यभर हे अभियान राबवण्यात येणार असून, त्याकरता आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी या परिषदेला उपस्थित राहून, या उपक्रमाला मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

या परिषदेला नाना पाटेकर, धर्मादाय सह आयुक्त दिलीप देशमुख आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याचेही कर्नल पाटील यांनी सांगितले. 

कार्यक्रमाविषयी 
धरण संजीवन परिषद 
स्थळ :  प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी सभागृह, शिवाजीनगर.
दिवस व वेळ : शनिवार, पाच जानेवारी, दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link