Next
‘जेएसपीएम’चा संघ ‘सुप्रा-२०१९’मध्ये अव्वल
BOI
Saturday, August 03, 2019 | 02:06 PM
15 0 0
Share this article:

‘सुप्रा २०१९’ स्पर्धेत अव्वल यश मिळवणारा राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा ‘रेडलाईन रेसिंग’ संघ.

पुणे : सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनीअर्स (एसएई) व मारुती सुझुकी यांच्या संयुक्त विद्यमाने दर वर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘सुप्रा’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत ‘जेएसपीएम’ संचालित राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या ‘रेडलाईन रेसिंग’ या संघाने तब्बल १२७ संघांमध्ये तिसऱ्या क्रमांकांचे पारितोषिक पटकावले असून, बेस्ट कार डिझाइनसाठीचे दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिकदेखील या संघाने मिळवले आहे. 

‘स्पर्धेच्या अतिशय खडतर नऊ चाचण्या पार करून या संघाने हे यश संपादन केले आहे,’ अशी माहिती विभाग प्रमुख डॉ. अविनाश बडदे यांनी दिली. 

‘या संघाने सलग दोन वर्षे ‘बेस्ट इकॉनॉमिकल कार’ या प्रकारामध्ये प्रथम पारितोषिक पटकावले आहे,’ अशी माहिती विद्यार्थी प्रमुख तुषार ब्राह्मणकर व मार्गदर्शक प्रा. सुंडगे यांनी दिली. 

‘जेएसपीएम’चे संस्थापक सचिव डॉ. तानाजी सावंत, प्राचार्य डॉ. आर. के. जैन, उपप्राचार्य प्रा. अविनाश देवस्थळी, प्रा. रवी सावंत व प्रा. सुधीर भिलारे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search