Next
बाल हक्कांसाठी विधानसभा नियमात बदल
प्रेस रिलीज
Friday, March 23 | 12:36 PM
15 0 0
Share this story

अॅड. आशीष शेलारमुंबई : महिलांचे हक्क व कल्याण याबाबत राज्य शासनाला शिफारशी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या विधिमंडळाच्या समितीमध्ये बालहक्कांचाही विचार करण्यात यावा, यासाठी विधानसभा नियमात सुधारणा करण्यात आली आहे. 

२१ मार्च रोजी महाराष्ट्र विधानसभा नियमात सुधारणा करणारी शिफारस, या समितीचे सदस्य आमदार अॅड. आशीष शेलार यांनी मांडली. या समितीने विधानसभा नियम २२५ (१) आणि २२५ (३) मध्ये ही सुधारणा सुचवली  आहे. विधानसभा नियम २२५नुसार सभागृहात कोणत्याही समितीच्या शिफारशी मांडण्यात आल्यानंतर, त्यात सुधारणेसाठी शिफारस करण्याची मुदत दहा दिवसांची होती. यातील मुदत दहा  दिवसांऐवजी पाच दिवस करणारी सुधारणा आमदार अॅड. आशीष शेलार यांनी सुचवली. सभागृहाने हे बदल बहुमताने मंजूर केले.

याबाबत सविस्तर भाषण करताना त्यांनी सांगितले, ‘महिलांचे हक्क व कल्याण यासंदर्भातल्या राज्य विधान मंडळाच्या समितीच्या कक्षा  वाढवून, त्यात बाल हक्कांचाही समावेश प्रस्तावित आहे. तसे झाल्यास ही समिती ‘महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समिती’ या  नावाने ओळखली जाईल. महिलांच्या हक्कांसोबतच ही समिती बालकांच्या हक्कांबाबतही सरकारला शिफारशी करेल. हा बदल याच अधिवेशनात करता यावा, म्हणून विधानसभा नियमात दहा दिवसांऐवजी पाच दिवस असा बदल करण्यात आला. या सरकारने ही बाल हक्कासाठी  घेतलेली अत्यंत सकारात्मक भूमिका असून, महिलांसोबतच बाल हक्कांबाबतही सरकार काम करते आहे.’ 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link