Next
भिवंडीत पर्यावरणपूरक होळी, रंगपंचमीसाठी प्रबोधन
BOI
Wednesday, March 20, 2019 | 11:57 AM
15 0 0
Share this article:भिवंडी : पर्यावरणपूरक होळी आणि रंगपंचमी साजरी करावी यासाठी भिवंडीतील शाळांमध्ये प्रबोधन करण्यात आले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) ठाणे जिल्हा प्रधान सचिव प्रा. गणेश शेलार यांनी भिवंडीत आठगाव विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात, तसेच सरावली, सोनाळे, गोवे व कोन या जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले.

प्रा. शेलार यांनी ‘होळी करा लहान पोळी करा दान’ या ‘अंनिस’च्या उपक्रमाची माहिती दिली. ‘पोळी होळीत टाकण्याऐवजी त्या गरिबांना दिल्या, तर त्यांचाही सण गोड होईल, असा उपक्रम भिवंडीत व कोन गावात गेली तीन वर्षे राबवला जात आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महिला पोळ्या दान करतात. ‘अंनिस’ कार्यकर्ते जमा झालेल्या पोळ्या विटभट्टीत काम करणारे कामगार, फुटपाथवर राहणारी लोक, गरीब लोकांना त्याच दिवशी वाटतात,’ अशी माहिती प्रा. शेलार यांनी दिलीपर्यावरणपूरक रंगपंचमी कशी साजरी करावी हेही प्रा. शेलार यांनी या वेळी सांगितले. रासायनिक रंग त्वचे, डोळ्यांसाठी परिणामकारक असल्याने नैसगिक रंगाचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. नैसर्गिक जलरंग व कोरडे रंग कसे बनवायचे या विषयीही त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. हळद व मैद्यापासून पिवळा रंग, बीट या फळापासून लाल रंग, पालक किंवा कडुनिबांच्या पाल्यापासून हिरवा रंग बनवता येत असल्याचे सांगताना पळस, झेंडूची फुले, जास्वंद या फुलांपासून नैसर्गिक रंग कसे बनवायचे या बद्दल प्रा. शेलार यांनी मार्गदर्शन केले.

या वेळी शिक्षक नम्रता पातकर, विलास गायक, राजेश कराळे, नीलिमा पाटील, गवळी, पुष्पावती भोईर आदी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search