Next
रक्तदाता दिनानिमित्त सह्याद्री हॉस्पिटल्सतर्फे सायकल फेरी
BOI
Friday, June 14, 2019 | 04:13 PM
15 0 0
Share this article:

सायकलफेरीला हिरवा झेंडा दाखवताना अन्न व औषधे विभागाचे सहआयुक्त एस. बी. पाटील, नरेंद्र साळुंखे यांच्यासह रक्तपेढी विभागाच्या प्रमुख डॉ. स्मिता जोशी, डॉ. पौर्णिमा राव, डॉ. कन्नन, डॉ. सोनल दीक्षित आणि डॉ. रवी प्रताप आदी.

पुणे : जागतिक रक्तदाता दिनाचे (वर्ल्ड ब्लड डोनर्स डे) औचित्य साधून शुक्रवारी, १४ जून रोजी सह्याद्री हॉस्पिटलच्या रक्तपेढीतर्फे सायकलफेरीचे आयोजन करण्यात आले होते. ५० रक्तदाते या फेरीत सहभागी झाले होते.  

डेक्कन येथील सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलपासून सकाळी सात वाजता ही फेरी सुरू झाली. तिचा समारोप खारघर येथील टाटा मेमोरियलची शाखा असलेल्या ‘एसीटीआरईसी’ येथे झाला. ‘फेडरेशन ऑफ बॉम्बे ब्लड बँक्स’तर्फे रक्तदात्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.  
   

या सायकलफेरीला अन्न व औषधे विभागाचे सहआयुक्त एस. बी. पाटील आणि पुणे महानगरपालिका ‘सायकल प्लॅन’चे प्रमुख नरेंद्र साळुंखे यांनी हिरवा झेंडा दाखवला. या वेळी सह्याद्री हॉस्पिटल्सच्या रक्तपेढी विभागाच्या प्रमुख डॉ. स्मिता जोशी आणि वरिष्ठ सल्लागार डॉ. पौर्णिमा राव, डॉ. कन्नन, हॉस्पिटल प्रशासनातर्फे डॉ. सोनल दीक्षित आणि डॉ. रवी प्रताप आदी उपस्थित होते. 

जागतिक रक्तदाता दिवस हा एबीओ ब्लड ग्रुप सिस्टिमचे नोबेल पारितोषिक विजेते कार्ल लँडस्टायनर यांच्या नावाने साजरा केला जातो. रक्तदानाबाबत जागरूकता निर्माण करणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search