Next
आयडियाची कॅशबॅक ऑफर
प्रेस रिलीज
Thursday, March 01 | 10:57 AM
15 0 0
Share this story

मुंबई : भारतातील सर्वात मोठ्या टेलिकॉम ऑपरेटर्सपैकी एक असलेल्या ‘आयडिया सेल्युलर’ने आपल्या अभूतपूर्व ऑफरद्वारे, सर्व नव्या फोर जी स्मार्टफोन्सच्या खरेदीवर मोठ्या कॅशबॅकची घोषणा केली आहे. ही ऑफर आयडियाच्या प्री-पेड आणि पोस्ट-पेड अशा दोन्ही गटांतील ग्राहकांना लागू असणार आहे. २३ फेब्रुवारी २०१८पासून सुरू झालेल्या या योजनेच्या कालावधीमध्ये कोणत्याही ब्रँडचा नवा फोर जी स्मार्टफोन विकत घेणाऱ्या आयडियाच्या सर्व ग्राहकांना दोन हजार रुपये कॅशबॅक मिळणार आहे.

भारतामध्ये अधिकाधिक ग्राहकांनी फोर जी हँडसेट्स विकत घेऊन, फोर जी तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात स्वीकारावे यासाठी राबविण्यात येणाऱ्या या ऑफरच्या प्रचारासाठी, एका धडाकेबाज जाहिरात मोहिमेचीही आखणी करण्यात आली आहे.

शशी शंकरया मोहिमेबद्दल बोलताना आयडिया सेल्युलरचे चीफ मार्केटिंग ऑफिसर शशी शंकर म्हणाले, ‘फोर जी हँडसेट अधिक परवडण्यासारख्या दरात उपलब्ध करून देत ग्राहकांना फोर जी तंत्रज्ञानामध्ये अपग्रेड करणे, हे या मोहिमेचे लक्ष्य आहे. नवा फोर जी स्मार्टफोन विकत घेण्याचा बेत असलेल्या सर्व ग्राहकांना अनुलक्षून आम्ही ही मोहीम राबवत आहोत.’

आयडियाच्या नव्या कॅशबॅक ऑफरबद्दलची टीव्ही जाहिरात विविध प्रकारचे ग्राहक व त्यांच्या विशिष्ट गरजा यांच्यापासून प्रेरणा घेत बनविण्यात आली आहे. मग तो आपल्या फोनमध्ये कोणती वैशिष्ट्ये हवीत हे नेमकेपणाने माहीत असलेला टेक-सॅव्ही ग्राहक असो, नाहीतर सर्वोत्तम सेल्फी कॅमेऱ्याच्या शोधात असलेला सेल्फी ग्राहक असो. सर्वोत्तम स्मार्टफोनसाठी कोणता पर्याय निवडायचा याबद्दल सदैव गोंधळालेली व्यक्ती असो किंवा स्वस्त आणि मस्त स्मार्टफोनच्या शोधातले कुणी असो. ग्राहकांचा प्रकार कोणताही असला, तरीही एक गोष्ट मात्र सगळ्यांनाच हवीशी वाटत असते आणि ती म्हणजे आपल्या खरेदीवर मिळणारी एखादी स्मार्ट सवलत! आयडियाच्या नव्या टीव्ही जाहिरातीमध्ये ग्राहकांचे हेच प्रकार गंमतीशीर आणि हलक्याफुलक्या पद्धतीने पेश करण्यात आले आहेत आणि सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी, सर्व प्रकारच्या फोर जी स्मार्टफोन्सवर आयडियाकडून दिल्या जाणाऱ्या दोन हजार रुपयांच्या कॅशबॅक ऑफरला अधोरेखित करण्यात आले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link