Next
डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या शताब्दी महोत्सवास प्रारंभ
प्रेस रिलीज
Tuesday, September 11 | 05:33 PM
15 0 0
Share this story

औंध : ‘पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी चार ऑक्टोबर १९१९ रोजी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून महाराष्ट्राच्या सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात एक नवी क्रांती घडवली. चार ऑक्टोबर १९१९ रोजी रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेला १०० वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने संस्थांतर्गत सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये संस्थेचा शताब्दी महोत्सव साजरा केला जात आहे. चार ऑक्टोबर २०१८पासून या शताब्दी महोत्सवाचा प्रारंभ होत आहे. औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाने त्यानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहेत,’ अशी माहिती प्राचार्य डॉ. मंजुश्री बोबडे यांनी दिली.

एक सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान येणारी कर्मवीर जयंती व सप्ताहाचे औचित्य साधून मराठी विभागातर्फे द. ता. भोसले लिखित ‘कुमारांचे कर्मवीर’ या पुस्तकाचे प्रकट वाचन करण्यात येत आहे. या उपक्रमाचा प्रारंभ मराठी विभागप्रमुख डॉ. संजय नगरकर यांच्या प्रथम पाठाच्या प्रकट वाचनाने झाला. याद्वारे दररोज ‘एक विद्यार्थी एक पाठ’ असे सार्वत्रिक स्वरूपात वाचन सुरू असून, आतापर्यंत चंद्रकांत सोनवणे, मोणाली भालवणकर, अमृता क्षीरसागर,  डॉ. सविता पाटील, आरती शिंदे, नेहा काकडे इतर विद्यार्थ्यांनी पाठाचे सामुहिक वाचन केले आहे. यापुढे ३० दिवस हा उपक्रम दररोज चालणार आहे.

वाचून झालेल्या पाठावर प्रश्नमंजुषा स्पर्धाही घेण्यात येत आहे. स्पर्धेतील विजेत्यांना प्राचार्य डॉ. बोबडे, उपप्राचार्य डॉ. विलास सदाफळ, वाणिज्य विभागप्रमुख डॉ. सुहास निंबाळकर, शतक महोत्सव समितीचे समन्वयक प्रा. भीमराव पाटील यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली.

या उपक्रमाबरोबरच कर्मवीरांच्या जीवनावरील राष्ट्रीय चर्चासत्र, जीवनदर्शन प्रदर्शन, क्रीडा स्पर्धांचे आयोजन, रोजगार मेळावा, कौशल्ययुक्त प्रशिक्षण अशा अनेक उपक्रमांचे वर्षभर आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. बोबडे यांनी दिली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link