Next
‘युवतींनी स्वत:तील क्षमता सिद्ध करावी’
दिप्ती गाट यांचा सल्ला
प्रेस रिलीज
Thursday, November 22, 2018 | 02:14 PM
15 0 0
Share this story

युवती सक्षमीकरण शिबिरातील सहभागी युवतींसह सहाय्यक गटविकास अधिकारी दिप्ती गाट आणि वीर सेवा दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते.

कोरोची : ‘युवतींनी वाईट गोष्टींपासून परावृत्त होऊन आपल्या करियरकडे जास्त लक्ष द्यावे, आपल्यातील क्षमता सिद्ध केल्यास जग आपोआप तुमच्याकडे वळेल’, असा सल्ला सहाय्यक गटविकास अधिकारी दिप्ती गाट यांनी दिला. आळते येथील युवती सक्षमीकरण शिबिराच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मवीर मल्टीस्टेटचे चेअरमन सुकुमार पाटील होते. 

दिप्ती गाट पुढे म्हणाल्या, ‘पालकांनी मुलींवर विश्वास ठेवायला हवा आणि तोच विश्वास मुलींनी सार्थ करायला हवा. प्रयत्न करत राहिल्यास कोणतीही गोष्ट अवघड नाही, यश तुमचेच आहे. जीवनात कोणतेही संकटे आल्यास त्याला धैर्याने सामोरे जायला हवे. आयुष्यात कष्ट व प्रयत्न थांबवू नका. जेव्हा प्रयत्न थांबवता त्या वेळी तुम्ही थांबता.’ 

या वेळी सुकुमार पाटील, भारतीय जैन संघटनेचे राजगोंडा पाटील, पारस वागोनी, अनिल पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. या शिबिराचे उद्घाटन वीर महिला मंडळाच्या अध्यक्षा विजयाताई पाटील, स्वयंसेवक विभाग प्रमुख अभय पाटील, अल्पसंख्यांक विभाग प्रमुख अनिल गडकरी, प्रांतीय प्रमुख अजीत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरासाठी प्रशिक्षक म्हणून दीपक पाटील यांनी काम पहिले. या शिबिरात ८५ युवतींनी सहभाग घेतला. सहभागी युवतींनीही आपले मनोगत व्यक्त केले. 

या वेळी अनिल मजलेकर, बाबू पाटील, बाहुबली पाटील, संजय पाटील आदींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास वीर सेवा दलाचे जिल्हा प्रमुख समोशरण भोकरे, तालुका प्रमुख आशिष देसाई, संघटक सुरेश मालगावे, करवीर प्रमुख सुरज चौगुले, प्रांतीय सदस्य प्रवीण धोतरे, जलद्कुमार पाटील, उत्तम पाटील, मध्यवर्ती सदस्य राकेश चौगुले, तुषार पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रांतीय सचिव विजय बरगाले, स्वागत प्रमोद हवाले यांनी, तर आभार तालुका सचिव अमोल चौगुले यांनी मानले. 

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संघनायक प्रतिक पाटील, मध्यवर्ती सदस्य हुव्वांना मजलेकर, तालुका सचिव अमोल चौगुले, अमर पाटील, आकाश पाटील, रोहित पाटील, अंकुश चौगुले, चेतन मजलेकर, प्रमोद जनगोंडा व संदीप पाटील यांनी परिश्रम घेतले. हा कार्यक्रम वीर सेवा दल, वीर महिला मंडळ, जैन समाज आळते, भारतीय जैन संघटना आणि वीर सेवा दल प्रांतीय, जिल्हा व तालुका समितीच्या वतीने घेण्यात आला. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BHARAT Gat About 78 Days ago
Liked...
0
0

Select Language
Share Link