Next
मोहोळ येथे मिनी डाळ मिल उद्योग प्रशिक्षण
BOI
Monday, December 03 | 01:05 PM
15 0 0
Share this story



सोलापूर :  राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत मोहोळ येथील कृषी विज्ञान केंद्र आणि सोलापूर येथील कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने चार दिवसीय कौशल्यविकास आधारित मिनी डाळ मिल उद्योग प्रशिक्षण आयोजित केले होते.

हे प्रशिक्षण २७ ते ३० नोव्हेंबर २०१८ या कालावधीत झाले. प्रशिक्षणाचे उद्घाटन कृषी विज्ञान केंद्राचे प्रभारी कार्यक्रम समन्वयक डॉ. तानाजी वळकुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मोहोळ कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डी. डी. कदम, ‘आत्मा’चे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सुहास ढवळे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक करताना विषय विशेषज्ञ (अन्नशास्त्र व तंत्रज्ञान) दिनेश क्षीरसागर यांनी या प्रशिक्षणाच्या आयोजनाची पार्श्वभूमी विशद केली. ‘शेतकऱ्यांनी कडधान्य प्रक्रियेच्या दृष्टीने डाळ मिल उद्योगाचे तंत्रज्ञान आत्मसात करावे आणि  कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून कृषीप्रक्रिया उद्योजक घडावेत,’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.



डॉ. वळकुंडे यांनी अध्यक्षीय भाषणात मिनी डाळ मिल उद्योग हे प्रशिक्षण शेतमालाचे मूल्यवर्धन करण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असल्याचे सांगितले; तसेच शेतकरी शेतीपूरक उद्योगांच्या सहाय्याने उद्योजक म्हणून पुढे आले, तर शेतमाल दराच्या अनिश्चिततेवर शेतकरी मात करू शकतील, असा विश्वास व्यक्त केला.

या प्रशिक्षणादरम्यान २९ नोव्हेंबर रोजी ‘आत्मा’चे प्रकल्प उपसंचालक विजय बरबडे यांनी भेट दिली. त्या वेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी लघुउद्योजक होण्याच्या दृष्टीने कौशल्याधारित प्रशिक्षणाचे महत्त्व आणि ‘आत्मा’च्या कृषी उद्योजाकांसाठी सहाय्यभूत योजनांविषयी माहिती दिली.

तांत्रिक सत्रात क्षीरसागर यांनी कडधान्य पिकांवरील प्रक्रियेचे महत्त्व व गरज, डाळ मिल उद्योग- तांत्रिक प्रक्रिया, डाळ मिल उद्योगासाठी लागणारी संयंत्रे, मिनी डाळ मिल उद्योग, प्रक्रियायुक्त उत्पादनांचे पॅकिंग, लेबलिंग, ब्रॅडिंग आणि विक्री व्यवस्थापन, उद्योग उभारणीतील महत्त्वाचे टप्पे व प्रकल्प अहवाल या विषयी माहिती दिली.

विषय विशेषज्ञ (कृषी विस्तार) अजय दिघे यांनी उद्योजकता विकास कौशल्ये व विक्री व्यवस्थापन या विषयी माहिती दिली. विषय विशेषज्ञ (मृदविज्ञान व कृषी रसायनशास्त्र) काजल जाधव यांनी कडधान्य पीक उत्पादन तंत्र याविषयी, तर प्रभारी कार्यक्रम समन्वयक डॉ. वळकुंडे यांनी डाळ मिल उद्योगातील चुरी, भुसा व पावडर या उपपदार्थांपासून पशुखाद्य तयार करण्याच्या तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली.



महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे जिल्हा समन्वयक राम सुतार यांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या सहाय्यभूत योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्रशिक्षणादरम्यान मिनी डाळ मिल संयंत्राच्या सहाय्याने डाळ बनविण्याचे प्रत्यक्ष कृती प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखविण्यात आले. या वेळी माढा तालुक्यातील कव्हे येथील  तुकाराम डाळ मिल उद्योग येथे शेतकऱ्यांच्या अभ्यास भेटीचे आयोजन करण्यात आले.

या प्रशिक्षणासाठी सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी, महिला स्वयंसहायता गटातील सदस्य व युवक बहुसंख्येने उपस्थित होते. प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी विषय विशेषज्ञ दिनेश क्षीरसागर, अजय दिघे, काजल जाधव, कार्यक्रम सहाय्यक तुषार अहिरे, विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या) किरण जाधव,  सुयोग ठाकरे, नरेंद्र जाधव, ज्ञानेश्वर तांदळे, संजय बनसोडे, नितीन बागल, अरुण गांगोडे, शंकर सुतार यांनी परिश्रम घेतले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link