Next
नवले कॉलेजमध्ये महिला दिन उत्साहात साजरा
प्रेस रिलीज
Monday, March 11, 2019 | 04:48 PM
15 0 0
Share this article:



कुसगाव : येथील एन. बी. नवले कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्समध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त कॉलेजमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिला प्राध्यापिका आणि विद्यार्थिनींच्या हस्ते कर्तबगार, समाजधुरीण महिलांच्या प्रतिमा पूजनाने व दीपप्रज्वलन करण्यात आले.  

प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ. जयवंत देसाई यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाची सुरुवात व इतिहास कथन केला; तसेच या वर्षीच्या ‘थिंक इक्वल, बिल्ड स्मार्ट, अँड इनोव्हेट फॉर चेंज’ या थीमविषयी माहिती दिली. तामिळनाडूच्या जिद्दी कर्तृत्ववान मायलेकींनी एकाच वेळी सरकारी नोकरी मिळविल्याची बातमी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ या ऑनलाइन मीडिया पोर्टलवर प्रसिद्ध झाली होती. या  बातमीचा संदर्भ देऊन प्रतिकूल परिस्थितीमध्ये महिला किती उच्च प्रतीचे यश संपादन करू शकतात हे सांगितले.

यानंतर प्रा. डॉ. उर्मिला पाटील, सोनाली सरसंबे, प्रा. सतीश सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयामधील विद्यार्थिनींनी स्त्री जन्माविषयक छोटेखानी नाटिका सादर केली. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. निर्मला शिंगे यांनी केले होते. सूत्रसंचालन श्रद्धा पोंगडे हिने केले. या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये बीनाईफर पारवा, सारिका कुमारी गुप्ता आणि टीवाय बीकॉमच्या विद्यार्थिनींचा सहभाग होता. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search