Next
गंगाधर महांबरे
BOI
Wednesday, January 31 | 03:45 AM
15 0 0
Share this story

‘संधिकाली या अशा धुंदल्या दिशा दिशा, चांद येई अंबरी..’सारखं नितांतसुंदर प्रणयगीत लिहिणारे गंगाधर मनमोहन महांबरे यांचा ३१ जानेवारी हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
.......
३१ जानेवारी १९३१ रोजी मालवणमध्ये जन्मलेले गंगाधर मनमोहन महांबरे हे कवी, गीतकार आणि बालसाहित्यकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी अनुवादक, ग्रंथपाल आणि कोशकार म्हणूनही योगदान दिलं आहे. पुण्यामधल्या फिल्म इन्स्टिट्यूटचे ग्रंथपाल म्हणून त्यांनी अनेक वर्षं काम केलं होतं.  

‘मौलिक मराठी चित्रगीते’ या त्यांच्या रसग्रहणात्मक पुस्तकाला ‘राष्ट्रपती सुवर्णकमळ मिळालं होतं. तसंच दिल्लीच्या नॅशनल प्रॉडक्टिव्हिटी कौन्सिलकडून त्यांना १९८३ सालचा ‘पोएट ऑफ दी इयर’ पुरस्कार मिळाला होता. गोमंतक मराठी अकादमीनेसुद्धा त्यांना सन्माननीय फेलोशिप दिली होती. केंद्र सरकारकडून आणि महाराष्ट्र सरकारकडूनत्यांना पुरस्कार मिळाले होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ना. घ. देशपांडे पुरस्कार, तसंच चित्रपट महामंडळाचा ‘चित्ररत्न’ हे पुरस्कारही त्यांना मिळाले होते. 

दिलजमाई, रंगपंचमी, उषःकाल, रसिका तुझ्याचसाठी, आनंदाचे डोही, मौलिक मराठी चित्रगीते, ग्रामीण उद्योगाच्या वाटा, सिंधुदुर्ग, कोल्हा आणि द्राक्षे, देवदूत, संतांची कृपा, नजराणा, गौतम बुद्ध, जादूचा वेल, जादूची नगरी, बेनहर, मत्स्यव्यवसाय, २१व्या शतकाचा इंग्रजी-मराठी शब्दकोश, चित्रपट क्षेत्रातला तांत्रिक शब्दांचा कोश, चार्ली चॅप्लिन, दादासाहेब फाळके, एक अविस्मरणीय मामा, भावगीतकार ज्ञानेश्व र, मौनांकित असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. 

२२ डिसेंबर २००८ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link