Next
‘भारताची कॅशलेस राष्ट्राच्या दिशेने योग्य वाटचाल’
प्रेस रिलीज
Friday, July 27, 2018 | 04:02 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘भारतीयांनी डिजिटल पेमेंट पर्यायाचा स्वीकार केला असून, समाजातील सर्व स्तरातील लोकांना डिजिटायझेशन मोहिमेत सामील करून घेण्यासाठी युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) हे मोठे सहाय्यक ठरले आहे. ऑनलाइन पेमेंट क्षेत्रात ज्या प्रमाणात नाविन्यपूर्ण बदल घडत आहेत ते पाहता भारत पुढे जाता एक अस्सल कॅशलेस राष्ट्र बनेल’ असा आशावाद इन्फोसिसचे सह-संस्थापक आणि अध्यक्ष नंदन नीलेकणी यांनी व्यक्त केला.

मेघनाद देसाई अॅकॅडमी ऑफ इकॉनॉमिक्स (एमडीएइ) यांच्यातर्फे ‘विस्कळितपणा हाताळताना’ (Dealing With Disruption) या चर्चासत्राचे आयोजन वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या सहयोगाने एमडीएइ संस्थेच्या आवारात केले होते. त्यावेळी ते बोलत होते. एकंदरीत परिस्थिती उत्साहजनक असून, कॅशपासून ते कॅशलेस व्यवहारांकडे जाण्यासाठी आवश्यक ते उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर भारतात असल्याने मोनोपोली निर्माण न होता हे परिवर्तन शक्य असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

या चर्चासत्रात निलेकणी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बदलते मार्केट आणि अर्थव्यवस्थेशी जुळवून घेण्याबाबत आपले विचार मांडले. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग टेक्नॉलॉजीस कशाप्रकारे प्रयोगशाळा आणि संशोधन केंद्रातून बाहेर पडून आता आपल्या वास्तवाचा आविभाज्य भाग बनले आहेत यावरही त्यांनी मार्गदर्शन केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search