Next
रत्नागिरीकरांनी अनुभवली गवतफुलांची मजा...
BOI
Friday, August 24, 2018 | 03:08 PM
15 0 0
Share this storyरत्नागिरी :
‘रंगरंगुल्या सानसानुल्या गवतफुला रे गवतफुला’ या कवितेत इंदिरा संत यांनी गवतफुलांची गंमत सांगितली आहे. श्रावण सुरू झाल्यानंतर निसर्गात पाहायला मिळणारी ही गंमत अनुभवण्यासाठी रत्नागिरीत नुकतेच ‘नेचर वॉक’चे आयोजन करण्यात आले होते. ‘पाहून तुजला हरखुन गेलो, अशा तुझ्या रे रंगकळा’ असे गवतफुलांना पाहून सर्वांना वाटले. रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालय आणि पर्यावरण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पावसाळ्यात पठारावर आढळणाऱ्या विविध वनस्पती आणि रानफुले यांचे निरीक्षण करण्यासाठी विमानतळ परिसरात रविवारी, १९ ऑगस्ट २०१८ रोजी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. नागरिक आणि महाविद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी यांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.कार्यक्रमाच्या प्रारंभी पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष आणि दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर यांनी संस्थेतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या पर्यावरणविषयक उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले. ‘पठारावरील वैशिष्ट्यपूर्ण वनस्पतींच्या विश्वाविषयी आपण अधिक सजग असले पाहिजे. त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची गरज आहे,’ असे गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी सांगितले.प्रा. शरद आपटे यांनी पठारावर वाढणाऱ्या विविध अल्पकालीन फुलझाडांची, औषधी वनस्पतींची, कंदमुळांची शास्त्रीय माहिती दिली. या वेळी अॅड. संध्या सुखटणकर, डॉ. राजीव सप्रे, पर्यावरण संस्थेचे सचिव डॉ. दिलीप सावंत, डॉ. दिलीप नागवेकर आदी मान्यवर उपस्थित होते. या निसर्ग सहलीसाठी खास पनवेलहून आलेले प्रशांत खोबरेकर आणि जगदीश जाधव यांनी हा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगून अनेक वनस्पतींची आपल्याला नव्याने माहिती झाल्याचे सांगितले. या सहलीमध्ये यतीन दामले, अनघा दामले, मंदार भागवत, विशाल मगदूम, श्रीवल्लभ साठे हे माजी विद्यार्थी, तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. 

महाविद्यालयाच्या वनस्पतिशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. मंगल पटवर्धन, डॉ. सोनाली कदम, डॉ. अमित मिरगळ, प्रा. ऋजुता गोडबोले यांनी या ‘नेचर वॉक’चे आयोजन केले होते. 

(कोकणात आढळणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण एकदांडी वनस्पतीविषयीचा विशेष लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. इंदिरा संत यांची ‘गवतफुला रे गवतफुला’ ही संपूर्ण कविता वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
makarand About 183 Days ago
गाेगटे जाेगळेकर महाविद्यालयाचा छान उपक्रम... पावसाळी फुलांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवावे.
1
0

Select Language
Share Link