Next
टाकाऊ वस्तूंपासून विद्यार्थ्यांनी बनविल्या कलाकृती
BOI
Monday, October 15 | 02:36 PM
15 0 0
Share this storyरत्नागिरी :
शारदोत्सवानिमित्त रत्नागिरीतील कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात विविध उपक्रम सुरू आहेत. त्याअंतर्गत, शाळेतील तिसरी व चौथीच्या दीडशे विद्यार्थ्यांनी कागद, पुठ्ठे आणि घरातील टाकाऊ वस्तू वापरून विविध कलाकृती साकारल्या. यामध्ये फ्लॉवरपॉट, कपाट, पेन स्टँड, शुभेच्छापत्रे, टोप्या अशा अनेक शोभिवंत वस्तूंचा समावेश आहे. या सर्व वस्तूंचे प्रदर्शन शाळेत मांडण्यात आले होते. ते पाहण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती.लहान मुलांमध्ये कलाकुसर व शोभिवंत वस्तू बनवण्याच्या कौशल्याची भर पडावी, याकरिता शारदोत्सवात दर वर्षी अशा वस्तू बनवण्यास सांगितल्या जातात. विद्यार्थी स्वतः व भाऊ-बहीण, आई-वडिलांच्या मदतीने या सर्व वस्तू बनवतात. या वस्तूंचे प्रदर्शन भरवल्यावर मुलांना प्रोत्साहन मिळते. कागदावर सुरेख चित्र रेखाटणे, शोभिवंत वस्तूचे रंगकाम करणे, बनवलेली वस्तू आखीव-रेखीव झाली पाहिजे, याकरिता विद्यार्थी खूप मेहनत घेतात.टाकाऊ करवंटीपासून बनवलेला तबला, डग्गा व अन्य वस्तूंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पुठ्ठ्यापासून बनवलेले टुमदार घर, पालखी, कप-बशी, विविध फळे, पेपर क्विलिंगपासून बनवलेली फुले, आइस्क्रीमच्या चमच्यांपासून पेन स्टँड, फुलदाणी, डायनिंग टेबल, तसेच तुळशी वृंदावन, झाड व त्यावर चिमुकल्या पक्ष्याचे घरटे, तोरण, हँगिंग पीस या वस्तूही विद्यार्थ्यांनी सुरेखपणे साकारल्या होत्या.दरम्यान, शारदोत्सवाचे औचित्य साधून शाळेमध्ये बालकांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासासाठी आहार आणि औषध यावर आयुर्वेदाचार्य मंजिरी जोग यांनी मार्गदर्शन केले. या वेळी सर्व पालक उपस्थित होते. मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम यांनी त्यांचे स्वागत केले.

(या वस्तूंच्या प्रदर्शनाची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत...)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link