Next
‘स्नेहांकुर’ करणार ग्रामीण भागात शालेय साहित्याचे वाटप
BOI
Thursday, June 13, 2019 | 05:41 PM
15 0 0
Share this article:



पुणे : ‘स्नेहांकुर – द रे ऑफ होप’ या स्वयंसेवी संस्थेतर्फे या वर्षी भोर, वेल्हे, पुरंदर, काळदरी, रायरेश्वर पठार या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. ६० शाळांतील सुमारे २२०० गरजू विद्यार्थ्यांना हे वाटप केले जाणार आहे. ही संस्था गेल्या आठ वर्षांपासून ग्रामीण भागातील मुलांसाठी काम करत आहे. 

हा कार्यक्रम तीन टप्प्यांमध्ये होणार आहे. कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात १९ जून रोजी भोरमधील २२ शाळांतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले जाईल. साळुंगण येथील जिल्हा परिषद शाळेत सकाळी साडेनऊ वाजता व दुपारी तीन वाजता वेळवंड येथील प्राथमिक शाळेत वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर २० जूनला वेल्ह्यातील १५ शाळांमध्ये साहित्याचे वाटप केले जाईल. सकाळी १० वाजता गुंजवणी येथील प्राथमिक शाळेत व दुपारी साडेबारा वाजता साखर प्राथमिक शाळेत वाटप होईल. पुरंदर, काळदरी, रायरेश्वर येथील २३ शाळांमध्ये २२ जून रोजी साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. 

केतकवळे येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात सकाळी आठ वाजता, काळदरी येथील शाळेत सकाळी ११ वाजता, तर दुपारी तीन वाजता रायरी माध्यमिक विद्यालयात वाटप केले जाईल, असे संस्थेतर्फे कळवण्यात आले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 64 Days ago
Hope , there will be more who will take this activity , and keep it going . After all this is a continuing need . Best wishes
0
0
Komal NC. About 70 Days ago
I want to donate some books .can u plz share the details
0
0

Select Language
Share Link
 
Search