Next
आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेचे आयोजन
प्रेस रिलीज
Thursday, August 17, 2017 | 11:40 AM
15 0 0
Share this article:

नाशिक : येथील मातोश्री शिक्षण संस्थेच्या मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन केंद्र आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने १८ व १९ ऑगस्टच्या दरम्यान आय. सी. सी. सी. सी. २०१७ ही दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय संशोधन परिषद होणार आहे. या परिषदेत भारतातून तसेच परदेशातून विविध विषयांतील तज्ञ संगणक, माहिती तंत्रज्ञान, अणुविद्युत व दूरसंचार, विद्युत, स्थापत्य तसेच यांत्रिकी अभियांत्रिकी विद्याशाखेतील शोधनिबंध सदर करणार आहेत.
 
परिषदेच्या उद्घाटनाप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. विश्वास गायकवाड, संस्थेचे सचिव कुणाल दराडे व प्राचार्य डॉ. गजानन खराटे उपस्थित राहणार आहेत. वॉशिंग्टन येथील मशीन लर्निंग लॅबचे संचालक डॉ. अजिथ अब्राहम परिषदेचे मुख्य वक्ते म्हणून उपस्थित राहणार असून ते ‘डिजिटल इकोसिस्टीम- चॅलेन्जेस फ्रॉम ए डाटा अॅनालीसिस पर्स्पेक्टिव’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

परिषदेचे आयोजन संगणक अभियांत्रिकी विभागाच्या विभागप्रमुख व महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. वर्षा पाटील यांनी केले आहे. परिषदेचे समन्वयक प्रा. रणजीत गावंडे, प्रा. स्वाती भावसार असून या समितीत डॉ. विजय शर्मा, प्रा. दत्तात्रय पाळंदे, प्रा. रुपाली खुळे, प्रा. ज्ञानेश्वर आहिरे, प्रा. प्रमोद साठे, प्रा. प्रमोद पाटील,  प्रा. प्रवीण आंधळे, प्रा. दत्तात्रय शिंगटे, प्रा. प्रांजली जाधव, प्रा. शितल वाघ, प्रा. अक्षता दिघे, प्रा. जान्हवी बोरसे, प्रा. हर्षला अंतापूरकर काम बघणार आहेत. परिषदेच्या यशस्वीततेसाठी जयश्री बेदाडे, जगदीश धोंगडे, आकांक्षा कुलकर्णी, वैभव सोनोने आदी प्रयत्नशील आहेत.

संशोधन परिषदेविषयी अधिक माहितीसाठी : प्रा. पूनम ढोली, प्रा. अल्पना बोरसे
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search