Next
‘‘वर्ल्ड टुरिझम’मध्ये कोकण महत्त्वाचे ठिकाण ठरेल’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
BOI
Friday, November 02, 2018 | 02:35 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘कोकणचे ब्रँडिंग,मार्केटिंग करण्यासाठी ‘ग्लोबल कोकण फेस्टिव्हल’च्या माध्यमातून होणाऱ्या सातत्यपूर्ण कामातून कोकणचा ‘ब्रँड’ तयार होत असून, वृक्षराजी, तळी आणि गोव्यापेक्षा चांगले सागरकिनारे यामुळे ‘वर्ल्ड टुरिझम’मध्ये कोकण महत्त्वाचे ठिकाण ठरेल’, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

‘ग्लोबल कोकण फेस्टिव्हल’चे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी सायंकाळी झाले. या वेळी समाजकल्याण मंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे,  आमदार विजय काळे, योगेश टिळेकर, जगदीश मुळीक, महापौर मुक्ता टिळक, विजय गोगावले, किशोर धारिया उपस्थित होते. गेली सहा वर्षे मुंबईत होणारा ‘ग्लोबल कोकण फेस्टिव्हल’ या वर्षी प्रथमच पुण्यात आयोजित करण्यात आला आहे . 

कोकण भूमी प्रतिष्ठान आणि ‘ग्लोबल कोकण फेस्टिव्हल’चे अध्यक्ष संजय यादवराव यांनी प्रास्ताविक केले. सहसंयोजक एम. क्यू. सय्यद यांनी स्वागत केले. कोकणातील यशस्वी उद्योजकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . 

मुख्यमंत्री म्हणाले, ‘यापूर्वीही मुंबईच्या ग्लोबल कोकण फेस्टिव्हल’मध्ये मी सहभागी झालो होतो. या वर्षी पुण्यातही उपस्थित राहण्याचा योग आला. संपूर्ण कोकण या फेस्टिव्हलमध्ये पाहायला मिळते. कोकण भूमी प्रतिष्ठान, ‘ग्लोबल कोकण फेस्टिव्हल’ने सातत्यपूर्ण कामातून कोकणचे ब्रँडिंग, मार्केटिंग करण्यासाठी प्रयत्न केले, हे कौतुकास्पद आहे. त्यातून कोकणचा ‘ब्रँड’ तयार होत असून, वृक्षराजी,तळी आणि गोव्यापेक्षा चांगले सागर किनारे यामुळे ‘वर्ल्ड टुरिझम’साठी कोकण महत्त्वाचे ठिकाण ठरेल.’ 

कोकणभूमी प्रतिष्ठान विकसित करत असलेल्या पाच गावांची माहितीपुस्तिका मुख्यमंत्र्यांना देताना ‘ग्लोबल कोकण फेस्टिव्हल’चे अध्यक्ष संजय यादवराव.

पर्यटन वृद्धीसाठी पाच गावे कोकण भूमी प्रतिष्ठानने निवडली असून, तेथे होम स्टे टुरिझम वृद्धिंगत केले जाणार आहे, हे महत्त्वाचे पाऊल आहे. सरकारही कोकण विकासासाठी प्रयत्न करीत असून, चिपी विमानतळ, रत्नागिरी विमानतळ, दिघी बंदर आणि चौपदरीकरण होत असलेला मुंबई -गोवा महामार्ग यामुळे कोकणची कनेक्टिव्हीटी वाढणार असून, चार तासात कोकणात पोहोचणे शक्य होणार असल्याने पर्यटक कोकणात येण्यास मदत होणार आहे. 

हा फेस्टिव्हल चार नोव्हेंबरपर्यंत सकाळी १० ते रात्री १० सुरू राहणार आहे. कोकण विकासविषयक परिसंवादाचे दर रोज आयोजन केले जात आहे. कोकणची संस्कृती, कला, रोजगार, बांधकाम व्यवसाय,स्टार्टअप, पर्यटन, गुंतवणूक, फळ प्रक्रिया, खाद्यसंस्कृतीविषयक स्टॉल या प्रदर्शनात मांडण्यात आले असून, दीडशेपेक्षा अधिक स्टॉल्स, पाचशेपेक्षा अधिक कोकणी उद्योजकांचा सहभाग, दोन लाखाहून अधिक कोकणप्रेमींची उपस्थिती आहे. फूड फेस्टिव्हल, फॅशन शो, मनोरंजनाचे कार्यक्रम यांचेही आयोजन करण्यात आले आहे .
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search