Next
राज्यात गुलाबी थंडीचं आगमन
BOI
Tuesday, November 14 | 04:49 PM
15 0 0
Share this story

मुंबई : बोचणारा गार वारा, धुक्यात हरवलेले रस्ते आणि नाक्या-नाक्यावर पेटणाऱ्या शेकोट्यांनी राज्यभरात थंडीची चाहूल लागल्याचे संकेत दिले आहेत. तापमानाचा किमान पारा १० अंशांवर उतरला असून, १३ नोव्हेंबरपर्यंत सर्वात कमी तापमानाची नोंद नाशिकला (१०.२ अंश सेल्सिअस), तर सर्वाधिक तापमानाची नोंद रायगड जिल्ह्यातील भिरा येथे (३४.३ अंश सेल्सिअस) झाली आहे.

गेल्या महिन्यात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर तापमानात वाढ झाली होती; मात्र गुलाबी थंडीची चाहूल लागल्याने ‘ऑक्टोबर हीट’मुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मध्य महाराष्ट्राचा विचार केल्यास सर्वात कमी तापमानाची नोंद नाशिकला १०.२ अंश सेल्सिअस इतकी करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ अहमदनगर येथे १०.७ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. पुणे येथे ११.४ अंश सेल्सिअस, लोहगाव येथे १२.९ अंश सेल्सिअस, जळगाव येथे १३ अंश सेल्सिअस, कोल्हापूर येथे १५.५  अंश सेल्सिअस, महाबळेश्वर येथे १३.६ अंश सेल्सिअस, सांगली येथे १३.६ अंश सेल्सिअस, सातारा येथे ११.५ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली आहे.

मुंबईत २२ अंश सेल्सिअस, अलिबाग येथे १८.८ अंश सेल्सिअस, रत्नागिरीत १७.९ अंश सेल्सिअस, पणजीत २० अंश सेल्सिअस, धानू येथे १८.४ अंश सेल्सिअस, तर भिरा येथे १५.५ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.

मराठवाड्यातही पारा उतरला असून औरंगाबादला १३ अंश सेल्सिअस, परभणीत १२.५ अंश सेल्सिअस, नांदेडला १४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

विदर्भातही पारा १२ ते १६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. अकोल्यात १३.७ अंश सेल्सिअस, अमरावतीत १६.२ अंश सेल्सिअस, बुलडाणा येथे १४.६ अंश सेल्सिअस, ब्रह्मपुरीत १४.३ अंश सेल्सिअस, चंद्रपूरला १६.६ अंश सेल्सिअस, गोंदिया येथे १२.६ अंश सेल्सिअस, नागपुरात  १२.९ अंश सेल्सिअस, वाशीम येथे १५ अंश सेल्सिअस, वर्धा येथे १३.६ अंश सेल्सिअस, तर यवतमाळला १२.२ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.

दरम्यान, कोकणात थंडी जोर धरू लागल्याने आंब्याची कलमे मोहोरण्यास सुरुवात झाली आहे. कलमे वेळेत मोहरू लागल्यामुळे आंबा बागायतदारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link