Next
स्वादिष्ट वॅफल्सची दुनिया ... आता फर्ग्युसन रोडवर
प्रेस रिलीज
Thursday, May 31, 2018 | 03:37 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘वॅफल्स’ हे  मुळचे पाश्चात्त्य मिष्टान्न  भारतीयांना अगदीच काही नवीन नाही, मात्र आता ते सहजपणे उपलब्ध होऊ लागले आहे. त्यामुळे खवैय्यांमध्ये ‘वॅफल्स’ची चलती दिसून येत आहे.  पुणेकर खवैय्यांनाही ‘वॅफल्स’ने भुरळ घातली आहेच. अशा या अनोख्या ‘वॅफल्स’ची दुनियाच  फर्ग्युसन रोडवर खुली झाली आहे. विशेष म्हणजे ही ‘बबल वॅफल्स’ असून, ती वॅफल्स शाकाहारी आहेत. त्यात अंड्याचा वापर केलेला नाही. त्यामुळे शाकाहारी लोकांनाही याचा मनसोक्त आस्वाद घेता येईल. शुभारंभानिमित्त ३० आणि ३१ मे रोजी संध्याकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेत स्वादिष्ट वॅफल्स फक्त दोन रुपयांमध्ये उपलब्ध आहेत.

लंडन बबल कंपनीने (एलबीसी) सुरू केलेल्या या दालनात वेगवेगळ्या चवीचे आणि प्रकारचे  ‘बबल वॅफल्स’ मिळतात. बबल वॅफल रॅप्स, पॉकेट वॅफल्स असे प्रकार असून त्यात बेरी बे, ब्ल्यू बेरी क्रिम चीज, वाइल्ड-बेरी क्रिम चीज; तसेच चॉकलेटची आवड असलेल्या व्यक्तींसाठी रश लेडी रश, डेथ बाय चॉकलेट, मॅजिक वॅफल्स तसेच; ब्लॅकजॅक, लंडन बबलगम व जिम्मी न्युटेला असे वेगेवेगळे स्वाद  आहेत. थोडेसे कुरकुरीत पण नरम वॅफल्स त्यावर चॉकलेट आईस्क्रीम, आकर्षक सजावटीसह समोर येते तेंव्हा त्याची भुरळ खवैयांना पडली नाही तरच नवल !

सौरभ राठोड
हे अनोखे मिष्टान्न भारतात आणले आहे ते सौरभ राठोड या तरुणाने. भारतीयांना जगभरातील स्वादिष्ट मिष्टान्नांचा आस्वाद देण्याच्या उद्देशाने सौरभने २०१७ मध्ये ‘गॉबल मी गुड’ या कंपनीची स्थापना केली. लंडनमध्ये त्यांनी हे बबल वॅफल्स  पाहिले,त्यांना हा पदार्थ इतका आवडला की त्यांनी ‘लंडन बबल कंपनी’च्या (एलबीसी) सहकार्याने हे मिष्टान्न भारतात आणण्याचे ठरवले. ऑक्टोबर २०१७ मध्ये मुंबईमधील जुहू येथे आपले पहिले दालन सुरू केले. कंपनीने भारतात आतापर्यंत नऊ दालने सुरू केली आहेत. 

आगामी योजनांबाबत बोलताना सौरभ राठोड म्हणाले, ‘आणखी १५ दालने सुरू होण्याच्या टप्प्यावर आहेत. २०१९ अखेरपर्यंत फ्रँचायजी तत्वावर ही संख्या   दोनशे पर्यंत वाढवण्याची योजना आहे; तसेच २०१९ पर्यंत भारतात तीन आणखी आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थ दाखल करण्याचाही मानस आहे. ‘वॅफल्स’मध्ये तिखट, खास भारतीय मिष्टान्नाचे फ्युजन करण्याचीही योजना असून, त्यासाठी संशोधन सुरू आहे.’ 

 पुण्यातील हे दालन, व्यवसायाने वकिल असलेले यश मेहता, बांधकाम व्यवसायामध्ये असलेले आशय शाह , सुप्रसिद्ध चलन विनिमय स्टोअरचे मालक हर्ष पारेख  आणि व्यावसायिक राज ओसवाल या चार तरुणांनी आपले फूड अँड बेव्हरेजेस क्षेत्रामध्ये काहीतरी करून दाखवण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने सुरू केले आहे.  

सौरभ राठोड यांच्यासमवेत पुण्यातील ‘लंडन बबल कंपनी’च्या दालनाचे संचालक हर्ष पारेख, यश मेहता, आशय शाह आणि राज ओसवाल
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link