Next
विद्यार्थिनींनी तयार केली अंधांसाठी डिजिटल केन
BOI
Friday, May 10, 2019 | 11:00 AM
15 0 0
Share this article:

अंध व्यक्तींसाठी डिजिटल केनची निर्मिती करणाऱ्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थिनी समृद्धी कुलकर्णी, निधी कैकाडी व आकांक्षा उगले.नाशिक : नाशिकमधील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. मो. स. गोसावी तंत्रनिकेतनच्या विद्यार्थिनींनी अंध व्यक्तींसाठी उपयोगी अशा डिजिटल केनची निर्मिती केली आहे. यामुळे अंध व्यक्तींना कोणाच्याही मदतीशिवाय रस्ता ओलांडणे, पायऱ्या चढणे, रस्त्याने चालणे या गोष्टी अगदी सहजपणे करता येणे शक्य आहे. 

समृद्धी कुलकर्णी, निधी कैकाडी, आकांक्षा उगले या कम्प्युटर इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनींनी अंतिम वर्षाच्या प्रकल्पासाठी अंध व्यक्तींना उपयोगी ठरणारी डिजिटल केन विकसित केली आहे. 

या केनमध्ये विद्यार्थिनींनी पेडोमीटरचा वापर केला आहे. त्यामुळे पायऱ्यांची संख्या समजते. या केनला दोन अल्ट्रासॉनिक सेन्सर लावले आहेत. त्याव्दारे अंध व्यक्तीस ४०० सेमीपर्यंतच्या अडथळ्यांची माहिती बझरद्वारे होते. अडथळा विरहित रस्त्याचीही माहिती मिळते. बॅटरीवर चालणाऱ्या या केनला छोटे दिवे बसवण्यात आले आहेत. 

‘अंध व्यक्तींना दररोजच्या जीवनात अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. त्यांना रस्त्यात अडथळा असल्यास अडखळून पडणे, वस्तू किंवा गाडीला धडकणे अशा अपघातांपासून बचावण्यासाठी ही डिजिटल केन उपयुक्त ठरेल,’ असे मत आकांक्षा उगले हिने व्यक्त केले. 

विद्यार्थिनींनी तयार केलेल्या या अभिनव प्रकल्पाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रदीप देशपांडे यांनी त्यांचा सत्कार केला. उपप्राचार्य पुनमचंद जैन, प्रा.सारंग अजनाडकर, प्रा. पूजा किल्लेवाले, प्रा. सौरभ भोर यांनी या विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search