Next
रत्नागिरीतील पहिल्या फिशिंग टुर्नामेंटला चांगला प्रतिसाद
BOI
Monday, December 03, 2018 | 06:05 PM
15 0 0
Share this storyरत्नागिरी :
रत्नागिरीत प्रथमच ‘ओपन सर्फ फिशिंग टुर्नामेंट’ दोन डिसेंबर २०१८ रोजी आयोजित करण्यात आली होती. कोकण फिशिंग अँगलर्स फोरमतर्फे भाट्ये किनाऱ्यावर आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील अशा एकूण ४५ जणांनी भाग घेतला होता. मुंबईचे रणजित खानविलकर, मुंबईचे नितेश कोळवणकर आणि रत्नागिरीतील मिऱ्या गावचे संतोष सावंत या तिघांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावले.

खेडच्या दत्ता पदमुले यांना ‘अँगलर ऑफ दी इयर’ या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मांडवीच्या केतन भोंगले यांना ‘फर्स्ट फिश कॅचर’ म्हणून गौरविण्यात आले. स्पर्धेत सगळ्यांचे लक्ष वेधणाऱ्या १२ वर्षांच्या जय मंदार जाधव याला ज्युनियर अँगलर म्हणून सन्मानित करण्यात आले. मुंबईच्या विश्वा दरणे या मुलीनेही लक्षवेधक कामगिरी केली. या स्पर्धेत माशांच्या जातीनुसार व लांबीनुसार गुणांक ठरविण्यात आले होते. पकडलेल्या माशांना लगेच पुन्हा समुद्रात सोडून देण्यात आले. सर्व  विजेत्यांना रोख रक्कम, ट्रॉफी, फिशिंगची विविध उपकरणे आणि प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला. अन्य सहभागी स्पर्धकांना ‘ओपन सर्फ फिशिंग टुर्नामेंट’चे टी- शर्ट आणि प्रशस्तिपत्र देण्यात आले. रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित, भाट्ये गावाचे सरपंच पराग भाटकर, नगरसेवक सुदेश मयेकर आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.

ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी कोकण फिशिंग अँगलर्स फोरमचे पराग वाडकर, ओंकार शिवलकर, मंदार जाधव, दत्ता पदमुले, वैभव कदम, नितेश कोळवणकर, मयूर झिंगे, आशुतोष शेलार यांनी विशेष मेहनत घेतली.

बेंगळुरूमधून मार्कस ग्रीनवुड या स्पर्धेला मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. पेलेजिक ट्राइब आणि मस्ताड या कंपन्यांनी बक्षिसे प्रायोजित केली होती. या प्रायोजकत्वाकरिता पराग वाडेकर यांनी डेरेक डिसूझा यांचे विशेष आभार मानले. या स्पर्धेला रत्नागिरीतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानण्यात आले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link